आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL-7 :चेन्नई सुपरकिंग्जचा विजयी षटकार, दिल्लीवर 8 गड्यांनी मात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दोन वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएल-7 मध्ये विजयाचा षटकार ठोकला. चेन्नईने सोमवारी रात्री दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 8 गड्यांनी मात केली. डॅवेन स्मिथपाठोपाठ (79) सुरेश रैना (47) आणि धोनी (12) यांच्या नाबाद खेळीच्या बळावर चेन्नईने सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 5 बाद 178 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नईने दोन गड्यांच्या मोबदल्यात 19.4 षटकांत 181 धावा काढल्या.
धावांचा पाठलाग करणार्‍या चेन्नईकडून डॅवेन स्मिथने 51 चेंडूंत चार चौकार आणि आठ षटकारांच्या साह्याने 79 धावा काढल्या. तसेच रैनाने 27 चेंडूंत नाबाद 47 धावांची खेळी केली. धोनीने नाबाद 12 धावांचे योगदान दिले.
तत्पूर्वी दिल्लीकडून मुरली विजय (35) व डी कॉक (24) या दोघांनी पहिल्या गड्यासाठी 36 धावांची भागीदारी केली. कर्णधार पीटरसनला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर दिनेश कार्तिक व मुरली विजयने (18) तिसर्‍या गड्यासाठी 71 धावांची भागीदारी केली. हिल्फेनहास, मोहित शर्मा, रवींद्र जडेजा व अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक -
दिल्ली डेअरडेव्हिल्स : 5 बाद 178 धावा, चेन्नई सुपरकिंग्ज : 2 बाद 181 धावा.