आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL 7 First Qualifier KKR Vs KXIP Suspended Due To Rain News In Marathi

सामन्यांचा डबल धमाका, IPL -7 मधील दोन मोठे सामने आज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता/मुंबई - सातव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये बुधवारी सामन्यांचा डबल धमाका उडवणार आहे. स्पर्धेतील दोन मोठे सामने आज होणार आहे. क्वालिफायर-1 मध्ये किग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाइट रायडर्स समोरासमोर असतील. त्यानंतर दोन वेळेचा चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज आणि गतविजेता मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होईल. या सामन्यातील पराभूत झालेल्या टीमला स्पर्धेतून निरोप घ्यावा लागेल. विजेता संघाला केकेआर-पंजाब यांच्यातील पराभूत झालेल्या टीमसोबत क्वालिफायर-2 मध्ये खेळावे लागणार आहे.
आयपीएलच्या क्वालिफायरचा पहिला सामना मंगळवारी होणार होता. मात्र, पावसाच्या व्ययत्यामुळे हा सामना एक दिवस स्थगित करून बुधवारी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता हा सामना दुपारी चार वाजता होईल. तसेच दुसरा मुंबई आणि चेन्नई यांच्यातील सामना रात्री आठ वाजता मुंबईच्या मैदानावर होणार आहे.

कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली सुपरकिंग्जने सातत्याने चांगली कामगिरी केली. तसेच रोहित शर्माच्या मुंबईनेही समाधानकारक यश संपादन करत उपांत्य फेरी गाठली. मुंबईला पहिल्या टप्प्यातील पाचही सामन्यात विजय मिळवता आला नाही. मात्र, त्यानंतर मुंबईने भारतामध्ये दमदार पुनरागमन केले. चेन्नईने 14 पैकी नऊ सामन्यांत विजय मिळवून तिसरे स्थान गाठले. तसेच मुंबई इंडियन्स टीमने 14 पैकी सात विजयांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर धडक मारली.
चाहत्यांच्या उत्साहावर पावसाचे पाणी
आयपीएलचा क्वालिफायर सामना मंगळवारी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात होणार होता. मात्र, पावसाच्या व्यत्ययामुळे या सामन्यावर आणि चाहत्यांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. आता हा सामना बुधवारी दुपारी चार वाजता होणार आहे.