आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL 7 Kolkata Knight Riders Vs Chennai Super Kings, Divya Marathi

IPL-7 :कोलकाता नाइट रायडर्सवर चेन्नई सुपरकिंग्जचा 34 धावांनी विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची - ब्रेंडन मॅक्लुमचे दमदार अर्धशतक आणि रवींद्र जडेजाच्या (17 धावा, 4 बळी) अष्टपैलू कामगिरीच्या बळावर चेन्नई सुपरकिंग्जने कोलकाता नाइट रायडर्सचा 34 धावांनी पराभव केला.
पावसाच्या व्यत्ययामुळे केवळ 17 षटके निर्धारित करण्यात आलेल्या या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने प्रथम फलंदाजी करत 3 बाद 148 धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर ड्वेन स्मिथ (16) स्वस्तात बाद झाल्यानंतर मॅक्लुम (56) आणि रैना (31) या जोडीने 70 धावांची भागीदारी करत चेन्नईला सन्मानजनक धावसंख्येकडे नेऊन उभे केले. त्यानंतर कर्णधार धोनी (22) आणि रवींद्र जडेजा (17) यांनी आक्रमक फलंदाजी केली. प्रत्युत्तरात कोलकात्याचा सलामीवीर रॉबिन उथप्पाने 47 आणि युसूफ पठाणने 41 धावाची खेळी करूनही त्यांना पराभव पत्करावा लागला. हे दोघे वगळता कोलकात्याचा अन्य एकही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला नाही. कोलकात्याचा संघ 17 षटकांत 9 बाद 114 धावाच करू शकला.

मॅक्लुम झळकला
चेन्नईच्या आव्हानात्मक धावसंख्येत मॅक्लुमने मोलाची भूमिका बजावली. त्याने 40 चेंडूत 4 चौकार व एका गगनभेदी षटकाराच्या मदतीने 56 धावांची तडाखेबाज खेळी केली. सुरेश रैनानेही 4 चौकार व एका षटकाराच्या मदतीने 31 धावांचे योगदान दिले.

जडेजा सामनावीर
कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा हुकमी एक्का असलेला रवींद्र जडेजाने या सामन्यात घातक गोलंदाजी केली. फलंदाजीमध्ये 10 चेंडूत एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 17 धावांचे योगदान दिल्यानंतर गोलंदाजीतही त्याने प्रभावी कामगिरी केली. 4 षटकांत फक्त 12 धावा देत त्याने कोलकात्याचे 4 विकेट घेतल्या. या अष्टपैलू कामगिरीसाठी रवींद्र जडेजाला ‘मॅन ऑफ द मॅच’ चा पुरस्कार देण्यात आला.