आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL 7 Manish Pandey Record Latest News In Marathi

IPL-7 मधील पहिला चौकार, पहिला षटकार आणि पहिले अर्धशतक 'मनिष पांडे'च्‍या नावे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन प्रीमयर लीगच्‍या सातव्‍या पर्वाला दि. 16 एप्रिल रोजी सुरुवात झाली आहे.पहिला सामना शाहरुख खानच्‍या मालकीचा कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्‍स यांच्‍यादरम्‍यान खेळला गेला आहे. हा सामना कोलकाता नाइट रायडर्सने 41 धावांनी जिंकला

इंडियन प्रीमयर लीग म्‍हणजे विक्रमांचा पाऊस असतो. झटपटप्रकारचे क्रिकेट समाजात खूप लोकप्रिय होत आहे.
आतापर्यंत चर्चेत नसलेला मनीष पांडेने आयपीएल-7 पर्वातील पहिला चौकार, पहिला षटकार आणि पहिले अर्धशतक लगावण्‍याचा विक्रम केला आहे. त्‍याने 53 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार आणि दाने गगनचुंबी षटकार खेचत 64 धावांची विजयी खेळी केली.

आयपीएलच्‍या पहिल्‍या पर्वामध्‍येही त्‍याने प्रथम शतक लगावले होते. 2009 मध्‍ये आयपीएल मध्‍ये शतक लावणारा तो पहिला भारतीय फलंदाज होता. 2014 मध्‍ये आयपीएलमध्‍ये त्‍याच्‍याकडून अशाच चांगल्‍या खेळीची अपेक्षा आहे.