आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL 7 News In Marathi, Chennai Super Kings Vs Kolkata Night Riders Match, Divya Marathi

IPL-7: आजपासून भारतामध्ये टी-20 लीगचा तडका, चेन्नई-कोलकाता यांच्यात लढत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची - आयपीएलच्या ग्लॅमरस टी-20 लीगच्या सातव्या मोसमाच्या पूर्वार्धातील ‘आखाती’ पाहुणचार 30 एप्रिल रोजी आटोपला. आता मायदेशातील खमंग तडक्याला रांची येथील जेएससीए स्टेडियमवर शुक्रवारपासून (दि. 2) दमदार चेन्नई सुपर किंग्ज व कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील लढतीने सुरुवात होत आहे. रात्री आठपासून हा सामना आहे. त्यामुळे सार्वत्रिक निवडणूक अंतिम टप्प्याकडे झुकत असताना देशात पुन्हा एकदा आयपीएलचे वारे वाहायला लागले आहेत.

आयपीएलचे संपूर्ण बि-हाड भारतात हलवायचे असल्याने एक मे रोजी सामन्यांना सुटी होती. त्यामुळे खेळाडूंनाही विश्रांती मिळाली. आबुधाबीत विदेशी खेळाडूंचे आयपीएलवर वर्चस्व राहिले. मात्र, आता मायदेशात आयपीएल परतल्याने भारतीय खेळाडूंना आपले वर्चस्व सिद्ध करण्याची नामी संधी आहे. गौतम गंभीर, रोहित शर्मासारख्या ज्या खेळाडूंची आजवर आयपीएलच्या सातव्या मोसमात बॅट तळपली नाही, अशांना भारतात निदान आपली कर्तबगारी सिद्ध करण्याची संधी मिळेल. फिरकीला साथ देणा-या भारतीय खेळपट्ट्यांवर रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजासारखे खेळाडू देशी-विदेशी फलंदाजांना आपल्या तालावर नाचवताना दिसतील.

शुक्रवारी आमनेसामने येत असलेले चेन्नई सुपर किंग्जने दोनदा, तर कोलकाता नाइट रायडर्सने एकदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. चेन्नई आठ गुणांसह गुणतालिकेत दुस-या अन् कोलकाता चार गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

पुढे वाचा....