आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL 7 News In Marathi, Mumbai Indians, Kolkata Night Riders, Divya Marathi

मुंबई इंडियन्स-केकेआर लढतीने आयपीएलचा नारळ फुटणार !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - येत्या 16 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीमध्ये अबुधाबी, दुबई, शारजा येथे होणा-या आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याचा कार्यक्रम आज बीसीसीआयने जाहीर केला. त्यानुसार गतविजेते मुंबई इंडियन्स आणि 2012चे विजेते कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील अबुधाबी येथील लढतीने यंदाच्या आयपीएलवरील पडदा उठेल. दोन आठवड्यांच्या कालावधीत एकूण 20 सामने होणार आहेत. उर्वरित 40 सामन्यांचा कार्यक्रम नंतर जाहीर करण्यात येईल, असेही बीसीसीआयने कळवले आहे.


अबुधाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर 16 एप्रिल रोजी (बुधवार) रंगारंग उद्घाटन सोहळ्यानंतर दोन विजेत्यांमधील लढत होईल. शेख झायेद स्टेडियम (अबुधाबी), दुबई इंटरनॅशनल स्टेडियम (दुबई) आणि शारजा क्रिकेट स्टेडियम (शारजा) या तीन स्टेडियमवर सामने होतील. त्यापैकी अबुधाबी व दुबई येथे प्रत्येकी 7-7 सामने होतील, तर शारजामध्ये 6 लढती खेळवल्या जातील.


गृहमंत्रालयाशी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून निवडणुका झालेल्या राज्यांमध्ये आयपीएल सामने आयोजित करण्याबाबत परवानगी देण्यासाठी सतत बोलणी सुरू आहेत. केंद्राच्या निर्णयावर सर्व काही अवलंबून आहे. त्या प्रयत्नांना यश मिळेल, असा आशावादही बीसीसीआयने व्यक्त केला आहे.


आयपीएल-7 : यूएईत होणारे 20 सामने असे
सामना प्रतिस्पर्धी ठिकाण भारतीय वेळ
16 एप्रिल मुंबई - कोलकाता अबुधाबी रात्री 8 पासून
17 एप्रिल दिल्ली - बंगळुरू शारजा रात्री 8 पासून
18 एप्रिल चेन्नई - पंजाब अबुधाबी दुपारी 4 पासून
18 एप्रिल हैदराबाद - राजस्थान अबुधाबी रात्री 8 पासून
19 एप्रिल बंगळुरू - मुंबई दुबई दुपारी 4 पासून
19 एप्रिल कोलकाता - दिल्ली दुबई रात्री 8 पासून
20 एप्रिल राजस्थान - पंजाब शारजा रात्री 8 पासून
21 एप्रिल चेन्नई - दिल्ली अबुधाबी रात्री 8 पासून
22 एप्रिल पंजाब - हैदराबाद शारजा रात्री 8 पासून
23 एप्रिल राजस्थान - चेन्नई दुबई रात्री 8 पासून
24 एप्रिल बंगळुरू - कोलकाता शारजा रात्री 8 पासून
25 एप्रिल हैदराबाद - दिल्ली दुबई दुपारी 4 पासून
25 एप्रिल चेन्नई - मुंबई दुबई रात्री 8 पासून
26 एप्रिल राजस्थान - बंगळुरू अबुधाबी दुपारी 4 पासून
26 एप्रिल पंजाब - कोलकाता अबुधाबी रात्री 8 पासून
27 एप्रिल दिल्ली - मुंबई शारजा दुपारी 4 पासून
27 एप्रिल हैदराबाद - चेन्नई शारजा रात्री 8 पासून
28 एप्रिल बंगळुरू - पंजाब दुबई रात्री 8 पासून
29 एप्रिल कोलकाता - राजस्थान अबुधाबी रात्री 8 पासून
30 एप्रिल मुंबई - हैदराबाद दुबई रात्री 8 पासून