आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL-7 च्‍या ओपनिंग सेरेमनीमध्‍ये शाहरुख, धोनी, विराटची धमाल-मस्‍ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई - इंडियन प्रिमियर लीगच्या सातव्या पर्वाला काल थाटात प्रांरभ झाला आहे. ओ‍पनिंग सेरेमनीमध्‍ये बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान, दीपिका पदुकोण, माधुरी दीक्षित, धोनी, विराट यांनी धम्‍माल मस्‍ती केली आहे.

शाहरुखने रचले कोहलीचे स्वयंवर
कोलकता नाईट रायडर्स या संघाचा मालक शाहरुख खान याला स्टेजवर मस्ती करण्यात भारीच गंमत वाटते. या ओपनिंग सेरेमनीत शाहरुखने स्टेजवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा कर्णधार विराट कोहलीचे स्वयंवरही आयोजित केले होते. त्‍याने विराटच्‍या गळयात अनुष्‍का शर्माच्‍या फोटोचा हार टाकला.

धोनीचे बांधले हात
शाहरुख खानने मस्‍तीमध्‍ये धोनीलाही सोडले नाही. शाहरुखने धोनीचे हात बांधून त्‍याच्‍याशी गप्‍पा मारल्‍या त्‍यावेळी दीपिकाही स्‍टेजवर होती. लग्‍नापूर्वी धोनीसोबत दीपिकाचे नाव जोडले गेले होते.

ओपनिंग सेरेमनिची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...