आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL 7 Opening Ceremony News In Marathi, Virat Anushka\'s Relation Issue

IPL -7 च्‍या ओपनिंग सेरेमनीमध्‍ये विराटच्‍या गळ्यात \'अनुष्‍काची फोटोमाळ\'!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन प्रिमियर लीगच्या सातव्या पर्वाला काल थाटात प्रांरभ झाला आहे. ओ‍पनिंग सेरेमनीमध्‍ये बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने विराट कोहलीच्‍या गळयात अनुष्‍का शर्माची फोटोमाळ घालून विराटची चांगलीच मजा घेतली आहे. ओ‍पनिंग सेरेमनीमध्‍ये दीपिका पदुकोण, माधुरी दीक्षित, धोनी, विराट यांनी धम्‍माल मस्‍ती केली.

विराट आणि अनुष्‍का यांच्‍यातील प्रेमप्रकरणाची चर्चा अनेक दिवसांपासून आहे. परंतु, त्‍यांनी अफेअर नसल्‍याचे अनेकदा सांगितले होते. आम्‍ही फक्त चांगले मित्र असल्‍याचे ते सांगतात. काही दिवसांपूर्वीच विराट अनुष्‍काच्‍या घरी गेला होता. एवढेच नव्‍हे तर अनुष्‍काला 'बाय बाय' करताना दोघांना किस करतानाही पाहिले होते. दोघांना अनेकदा सोबत फिरतानाही पाहिले आहे

कोहलीचे स्वयंवर
कोलकता नाईट रायडर्स या संघाचा मालक शाहरुख खान याला स्टेजवर मस्ती करण्यात भारीच गंमत वाटते. या ओपनिंग सेरेमनीत शाहरुखने स्टेजवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा कर्णधार विराट कोहलीचे स्वयंवर आयोजित केले होते. त्‍याने विराटच्‍या गळयात अनुष्‍का शर्माच्‍या फोटोचा हार टाकला. अनुष्‍का शर्मा आणि विराट कोहली यांच्‍या अफेअरला घेवून माध्‍यमांमध्‍ये चांगलीच चर्चा सुरु आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा, IPL -7 च्‍या ओपनिंग सेरेमनीची छायाचित्रे...