वाद होणार नाही ते आयपीएल कुठले ? आयपीएलच्या सातव्या हंगामातील सर्वांत मोठा वाद काल(दि.6) झालेल्या मुंबई इंडियन्स विरुध्द रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु मधील खेळाडूंमध्ये झाला.
पोलार्डने भिरकावली बॅट
17 वे षटक मिचेल स्टार्क फेकत होता. आणि स्ट्राईकला होता तो आक्रमक फलंदाज किरॉन पोलार्ड. स्टार्कने चौथ्या चेंडूसाठी रन-अप घेत असताना त्याचवेळी पोलार्डने त्याला थांबण्याचा इशारा करुन स्टंप सोडून तो बाजू झाला. मात्र तरीही स्टार्कने चेंडू पोलार्डचा दिशेने टाकलाच. चेंडू पोलार्डला घासून गेल्याने पोलार्ड रागावर नियंत्रण ठेवू शकला नाही. त्याने रागाच्या भरात स्टार्कच्या दिशेने बॅट फेकुन मारली. दोन्ही पंचानी दोन्ही खेळाडूंना समजवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने संघातील खेळाडुंना शांत केले. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. तरी दोन्ही संघामध्ये शेवटपर्यंत धुसफुस कायम होती.
पोलार्डने पकडली विराटची मानगुट
स्टार्कशी झालेल्या वादाबद्दल विराटने पोलार्डला विचारणा करताच पोलार्डने विराटची मानगुटी धरली. तेव्हा त्यांच्यामध्येही बाचाबाची झाली. त्याने लागलीच पोलार्डचा हात झटकून टाकला.
विराट आणि गंभीरमध्येही झाला होता वाद
आयपीएल 6 मध्ये विराट कोहली आणि
गौतम गंभीरध्येही असाच वाद झाला होता. दोघेही खेळाडू दिल्लीचे होते. यांच्यामधील वादाने आयपीएलमध्ये चांगलीच खळबळ उडवून दिली होती.
पुढील स्लाइडवर पाहा, पोलार्ड आणि स्टार्कमधील वादाची छायाचित्रे..