आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL 7 : Pravin Tambe Exults After Hatrik Record Latest News In Marathi

तांबेची सोन्यासारखी चमक ! उथप्पा, गंभीरची अर्धशतके व्यर्थ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - क्रिकेटमधील अनिश्चिततेचा खेळ सोमवारी ठळकपणे दिसला. सलामीवीर रॉबिन उथप्पा (65) आणि गौतम गंभीर (54) यांच्या 121 धावांच्या सलामीनंतरसुद्धा कोलकाता नाइट रायडर्सला राजस्थान रॉयल्सने 10 धावांनी पराभूत केले. राजस्थानच्या विजयात प्रवीण तांबेने रॉयल हॅट्ट्रिक (3/26) आणि शेन वॉटसन (3/21) यांनी सिंहाची भूमिका बजावली. या दोघांनीच केकेआरच्या हातातोंडाशी आलेला विजयच हिसकावला. राजस्थानने 6 बाद 170 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात केकेआरला 6 बाद 160 धावाच काढता आल्या. प्रवीण तांबेच ‘प्लेअर आॅफ द मॅच’चा मानकरी ठरला.
लेगस्पिनर 42 वर्षीय प्रवीण तांबेने 16 व्या षटकात चमत्कारिक प्रदर्शन केले. तांबेने सलग चेंडंूवर मनीष पांडे, युसूफ पठाण आणि डोश्चेट यांना शून्यावर बाद केले. शेन वॉटसनने रॉबिन उथप्पा, गौतम गंभीर, आंद्रे रसेल यांच्या विकेट घेतल्या.
राजस्थानला या विजयानंतर 2 गुण मिळाले. आता राजस्थान 7 सामन्यांत पाच विजयांसह 10 गुण घेत तिसर्‍या क्रमांकावर आहे. कोलकाताला पराभवाची मालिका खंडित करण्यात अपयश आले.
राजस्थानच्या 170 धावा
तत्पूर्वी, केकेआरने टॉस जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीस बोलावले. राजस्थानच्या अव्वल चार फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. अजिंक्य रहाणेने 22 चेंडूंत 30 धावा, करुण नायरने 35 चेंडंूत 44 धावा, संजू सॅमसनने 31 चेंडूंत 37 धावा आणि कर्णधार शेन वॉटसनने 20 चेंडूंत 31 धावा काढल्या. रहाणे आणि नायर यांनी पहिल्या विकेटसाठी 6.3 षटकांत 52 धावा जोडल्या. नायरने यानंतर सॅमसनसोबत सात षटकांत दुसर्‍या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी केली.
आयपीएलमध्ये एकूण 12 हॅट्ट्रिक, 9 गोलंदाज
(अमित मिश्राने दिल्ली डेअरडेव्हिल्स, डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबादकडून एकूण 3 हॅट्ट्रिक केल्या).
2008 : बालाजी (चेन्नई), अमित मिश्रा (दिल्ली), एम. एंटिनी (चेन्नई)
2009 : युवराज (पंजाब), रोहित शर्मा (डेक्कन), युवराजसिंग.
2010 : प्रवीणकुमार (बंगळुरू)
2011 : अमित मिश्रा (डेक्कन)
2012 : अजित चंदिला (राजस्थान)
2013 : सुनील नरेन (कोलकाता), अमित मिश्रा (सनरायझर्स)
2014 : प्रवीण तांबे (राजस्थान)
संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स : 6 बाद 170. (रहाणे 30, करुण नायर 44, वॉटसन 31, संजू सॅमसन 37, 2/28 सुनील नरेन). कोलकाता नाइट रायडर्स : 6 बाद 160. (रॉबिन उथप्पा 65, गौतम गंभीर 54, 3/26 प्रवीण तांबे).