आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL 7 Sunil Narine's Fastest 50 News In Divya Marathi

सुनील नरेनचा वेगवान 50 विकेटचा विक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अबुधाबी - कोलकाता नाइट रायडर्सच्या कॅरेबियन स्पिनर सुनील नरेनने सर्वात वेगवान 50 विकेट घेण्याचा विक्रम केला. त्याने बुधवारी आयपीएल-7 मध्ये गतविजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध 20 धावा देत चार विकेट घेतल्या. यासह त्याने स्पर्धेतील 50 विकेटही पूर्ण केल्या. सुनील नरेनचे आयपीएलमधील हे तिसरे सत्र आहे. त्याने आतापर्यंत 32 सामन्यांत 13.88 च्या सरासरीने आणि 5.45 च्या इकॉनामी रेटने 50 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये 19 धावा देत घेतलेले पाच बळी ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली आहे.

सुनील नरेनची कामगिरी
वर्ष विकेट सर्वोत्कृष्ट
2012 24 5/19
2013 22 4/13
2014 4 4/20
2014 मध्ये सुनील नरेन आतापर्यंत एक सामना खेळला आहे.