आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL 7 Virender Sehwag Vs Mahendra Singh Dhoni News In Marathi

आज धोनी आणि सेहवाग भिडणार, IPL-7 मधील कट्टर प्रतिस्‍पर्धी खेळाडूंविषयी वाचा एका क्लिकवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अबुधाबी - आयपीएल-7 मध्ये आज (शुक्रवार) चेन्नई सुपरकिंग्ज आणि किंग्ज इलेव्हन यांच्‍यामध्‍ये सामना होणार आहे. चाहत्‍यांच्‍या मते, हा सामना सेहवाग विरुध्‍द धोनी असाच होणार आहे. दोन्‍ही संघामध्‍ये आक्रमक खेळाडू असल्याने चाहत्यांचे जोरदार मनोरंजन होईल, अशी आशा आहे.

आयपीएलमध्‍ये युवराजसिंहची लय वापस आली आहे. त्‍याने नाबाद 52 धावांची झंझावाती खेळी करत सर्व चाहत्‍यांना आनंदी केले आहे. भारतीय संघामध्‍ये असतांना ज्‍यांचे नेहमीच खटके उडाले असे धोनी आणि विरेंद्र सेहवाग हे आमने-सामने येत असल्‍याने क्रिकेटरसिकांना फटकेबाजीचा वेगळाच अनुभव येणार आहे.

चेन्नई सुपरकिंग्ज आयपीएलमध्ये दोन वेळा विजेतेपद जिंकल्यानंतरसुद्धा सर्वाधिक मजबूत संघ मानला जातो.

आपयपीएलमधील दोघांचेही प्रदर्शन
धोनी:
96 सामन्‍यांमध्‍ये 38.1 च्‍या सरासरीने 2243 धावा काढल्‍या. तसेच 13 अर्धशतकांचा समावेश आहे.

सेहवाग - 79 सामन्‍यांमध्‍ये 29.37 च्‍या सरासरीने 2174 धावा काढल्‍या. त्‍यामध्‍ये एक शतक तर, 15 अर्धशतकांचा समावेश आहे.

पुढील स्‍लाइडवर वाचा एकाच देशातील कोणकोणते खेळाडू एकमेकांवर पडू शकतात भारी...