आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंगळुरू- फिक्सिंग, सट्टेबाजीच्या घोळात अडकूनही आयपीएलच्या लिलावावर काहीही परिणाम झालेला नाही. म्हणूनच आयपीएल-7च्या लिलावात बुधवारी 212.35 कोटी रुपये खर्चिले गेले. युवराजसिंग 14 सामन्यांसाठी तब्बल 14 कोटींत विकला गेला. मद्यसम्राट विजय माल्यांच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने युवीला आपलेसे केले. सर्वात महागड्या खेळाडूचा आधीचा विक्रम गौतम गंभीरच्या (11.04 कोटी रुपये) नावावर होता. दिनेश कार्तिकला दिल्लीने 12.5 कोटींत खरेदी केले. विदेशी खेळाडूंत केविन पीटरसन 9 कोटींत दिल्लीचा झाला.
दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या वीरेंद्र सेहवागची इभ्रत थोडक्यात वाचली. एकेकाळचा आयकॉन प्लेअर असलेल्या वीरूला 3.20 कोटींचाच भाव मिळाला.
०पठाण बंधूंना तगडा तोटा: युसूफ-इरफानला एकूण 5.56 कोटी रुपये मिळतील. म्हणजेच गेल्या वर्षापेक्षा 12.35 कोटी रुपये कमी.
1. युवराज 14 कोटी
खरेदी : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने. आधी पुणे वॉरियर्स संघाकडून खेळला. 2013 मधील कामगिरी : 13 सामन्यांत 238 धावा, 6 बळी.
2. कार्तिक 12.5 कोटी
खरेदी : दिल्ली डेअरडेव्हिल्सने. गेल्या वर्षी मुंबईच्या संघात होता. 2013ची कामगिरी : 9 सामन्यांत 510 धावा, 12/ झेल/यष्टिचीत.
3. पीटरसन 9 कोटी
खरेदी : दिल्लीने ‘राइट टू मॅच’चा वापर करत पीटरसनला संघात कायम ठेवले. 2013 ची कामगिरी : 8 सामने, 305 धावा, 3 झेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.