आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL 8, 17th Match: Delhi Daredevils V Kolkata Knight Riders At Delhi

DD vs KKR : कर्णधाराच्या \'गंभीर\' खेळीने कोलकात्याचा दिल्लीवर सहज विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मयंक अग्रवालचा झेल घेताना उमेश यादव - Divya Marathi
मयंक अग्रवालचा झेल घेताना उमेश यादव
नवी दिल्ली - कर्णदार गौतम गंभीरचे अर्धशतक आणि युसूफ पठाणने केलेल्या तडका फडकी 40 धावांच्या जोरावर कोलकात्याने दिल्ली डेअरडेव्हील्सवर सहज विजय मिळवला आहे.
दिल्लीने कोलकाता नाईट रायडर्स संघासमोर विजयासाठी 147 धावांचे सोपे आव्हान ठेवले होतेय ऐन मोक्यावर युवराज बाद झाल्याने दिल्लीला मोठी धावसंख्या गाठता आली नाही. दिल्लीच्या तिवारीने सर्वाधिक 32 धावा केल्या. मॉर्कल, उमेश यादव आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
कोलकाता नाइट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
दिल्लीला पहिला झटका मयंक अग्रवालच्या रुपात लागला. 1 धाव काढून मयंक माेर्केलच्या बॉलवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या कर्णधार जेपी डुमिनीला पाच धाव संख्येवर सुनील नरेनने बाद केले. श्रेयस अय्यर 31 धावा काढून पीयूष चावलाच्या बॉलवर बोल्ड झाला. त्यानंतरही कोणत्याच फलंदाजाचा टिकाव लागला नाही. युवराजने फटकेबाजीचे संकेत दिले, पण चावलाच्या चेंडूवर उथप्पाने त्याचे स्टंपिंग केले आणि तो बाद झाला.
दोन्ही संघ -
दिल्ली डेअरडेव्हिल्स : मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यर, जेपी डुमिनी (कर्णधार), युवराज सिंह, एंजेलो मॅथ्यूज, मनोज तिवारी, केदार जाधव, नाथन कुल्टर, अमित मिश्रा, इमरान ताहिर, डोमनिक जोसेफ

कोलकाता नाइट रायडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), रॉबिन उथप्पा, यूसुफ पठान, उमेश यादव, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, मोर्ने मोर्कल, पीयूष चावला, रायन टेन डोश्टे, सुनील नरेन, आंद्रे रसेल

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, सामन्यातील काही खास फोटो...