आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ipl 8 26th Match Delhi Daredevils V Royal Challengers Bangalore At Delhi

क्रिस गेलचे विजयी वादळ, राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूचा १० गड्यांनी विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली - स्फाेटकफलंदाज क्रिस गेलच्या (नाबाद ६२) तुफानी वादळात रविवारी डुमिनीच्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे पानिपत झाले. गेल अाणि विराट काेहलीच्या अभेद्य ९७ धावांच्या भागीदारीच्या बळावर बंगळुरू संघाने यजमान दिल्लीवर १० गड्यांनी विजय संपादन केला. बंगळुरूचा यंदाच्या सत्रातील हा तिसरा विजय ठरला. दुसरीकडे दिल्ली संघाला चाैथ्या पराभवाला सामाेरे जावे लागले.

मिशेल स्टार्क (३/२०), वरून अॅराेन (२/२४) अाणि डेव्हिड विसे (२/१८) यांनी धारदार गाेलंदाजी करून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीला अवघ्या ९५ धावांत राेखले. त्यानंतर क्रिस गेल अाणि विराट काेहलीने अभेद्य भागीदारी करून बंगळुरूला १०.३ षटकांत विजय मिळवून दिला.
अावाक्यातल्या अाव्हानाच्या प्रत्युत्तरात बंगळुरूकडून सलामीच्या जाेडीने तुफानी खेळी केली अाणि संघाचा विजय निश्चित केला. यात काेहलीने २३ चेंडूंचा सामना करताना सहा चाैकारांच्या अाधारे नाबाद ३२ धावांची शानदार खेळी केली.

तत्पूर्वी, कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि हा निर्णय अचूक ठरला. स्टार्क आल्यापासून बंगळुरूच्या गोलंदाजीला धार चढली आहे. या सामन्यातही त्याने कसून गोलंदाजी केली. षटके, २० धावा आणि बळी हे त्याचे पृथक्करण डोळ्यात भरणारे होते. अॅरोननेही गडी टिपले. षटकांत त्याने अवघ्या २४ धावा मोजल्या. वाइजेनेही दोघांना बाद केले आणि फक्त १८ धावा दिल्या. पटेल आणि अब्दुल्लाने प्रत्येकी गडी बाद केला.
युव‘राज’ चालेना
आयपीएलचामहागडा खेळाडू युवराज सिंगची जादू या स्पर्धेत फिकीच आहे. या सामन्यातही धावांवर अॅरोनच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. गेल्या सामन्यातही युवी अपयशी ठरला होता.

गेलचे झंझावाती पुनरागमन
यंदासुुरुवातीच्या सामन्यात अपयशी ठरलेल्या क्रिस गेलने झंझावाती खेळी करून पुनरागमन केले. त्याने ४० चेंडूंत नाबाद ६२ धावा काढल्या. यात चाैकार षटकारांचा समावेश अाहे.

पुढील स्लाइडमध्ये, धावफलक

फोटो - दिल्लीविरुद्ध सामन्यात फटका मारण्याच्या प्रयत्नात राॅयल्स चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा क्रिस