आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL : किंग्ज क्लीन ‘बाेल्ट’, सनरायझर्स हैदराबाद संघाचा तिसरा विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माेहाली - डेव्हिड वाॅर्नरच्या सनरायझर्स हैदराबाद संघाने अाठव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत शानदार विजय मिळवला.पाहुण्या हैदराबादच्या संघाने साेमवारी यजमान किंग्ज इलेव्हन पंजाबचा २० धावांनी पराभव केला. हैदराबाद संघाने स्पर्धेत तिसरा विजय संपादन केला. जाॅर्ज बेलीच्या पंजाब संघाला पाचव्या पराभवाला सामाेरे जावे लागले.
डेव्हिड वाॅर्नर (५८), हेनरिक्स (३०) अाणि नमन अाेझाच्या (३०) धडाकेबाज खेळीमुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबाद संघाने ६ बाद १५० धावा काढल्या हाेत्या. ट्रेंट बाेल्ट (३/१९) अाणि भुवनेश्वर कुमारने (२/२३) प्रत्युत्तरात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला १३० धावांत गुंडाळले.
खडतर अाव्हानाचा पाठलाग करणाऱ्या पंजाबची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर मनन वाेहरा (५) अाणि शाॅन मार्श (१) झटपट बाद झाले. त्यानंतर वृद्धिमान साहाने संघाचा डाव सावरला. त्याने ४२ धावांची शानदार खेळी केली. मात्र, त्याला साथ देणाऱ्या फलंदाजांना मैदानावर फार काळ अाव्हान कायम ठेवता अाली नाही.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून किंग्ज इलेव्हन पंजाबने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानावर उतरलेल्या हैदराबादला चांगली सुरुवात करता अाली नाही. शिखर धवन (१) स्वस्तात बाद झाला. नंतर विहारीने संघाचा डाव सावरला. त्याने संघाला चांगली सुरुवात करून दिली.
वाॅर्नरचा झंझावात
सनरायझर्स हैदराबाद संघासाठी डेव्हिड वाॅर्नरने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. त्याने शानदार अर्धशतक ठाेकले. वाॅर्नरने पंजाबच्या गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेताना ४१ चेंडूंत ५८ धावा काढल्या. यात १० चाैकार अाणि एका षटकाराचा समावेश अाहे. याशिवाय त्याने विहारीसाेबत ४५ धावांची भागीदारी केली.

पंजाबचा पाचवा पराभव
जाॅर्ज बेलीच्या किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाला यंदाच्या सत्रात पाचव्या पराभवाला सामाेरे जावे लागले. या टीमला साेमवारी हैदराबादने धूळ चारली. पंजाबने यंदा सात सामन्यांत केवळ दाेन विजय मिळवले, तर पाच सामन्यांत लाजिरवाणा पराभव पत्करला.

बाेल्ट, भुवनची धारदार गाेलंदाजी
हैदराबादकडून ट्रेंट बाेल्ट (३/१९) अाणि भुवनेश्वर कुमारने (२/२३) धारदार गाेलंदाजी करताना संघाला विजय मिळवून दिला. बाेल्टने चार षटकांत १९ धावा देत पंजाबच्या तीन फलंदाजांना बाद केले. तसेच भुवनेश्वरने चार षटकांत २३ धावा देऊन दाेन विकेट घेतल्या. प्रवीण व हेनरिक्सने प्रत्येकी एक बळी घेतला.

धावफलक
सनरायझर्स हैदराबाद धावा चेंडू ४ ६
वॉर्नर झे. मिलर गो. पटेल ५८ ४१ १० १
धवन झे. विजय गो. जॉन्सन ०१ ०२ ० ०
विहारी झे. व्होरा गो. अनुरीत ०९ ०८ २ ०
हेनरिक्स त्रि.गो. संदीप शर्मा ३० ३२ १ ०
ओझा झे. मिलर गो. पटेल २८ २६ ३ ०
बोपारा झे. शहा गो. जाॅन्सन ०० ०२ ० ०
आशिष रेड्डी नाबाद २२ ०८ १ २
कर्ण शर्मा नाबाद ०१ ०१ ० ०
अवांतर : १. एकूण : २० षटकांत ६ बाद १५० धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-१०, २-५६, ३-७६, ४-१२१, ५-१२३, ६-१३६. गोलंदाजी : संदीप शर्मा ४-१-३५-१, मिशेल जॉन्सन ४-०-३९-२, अनुरीत सिंग ४-०-२७-१, मुरली विजय ३-०-१६-०, अक्षर पटेल ४-०-२५-२, रिशी धवन १-०-७-०.

किंग्ज इलेव्हन पंजाब धावा चेंडू ४ ६
मुरली विजय धावबाद (विहारी/अाेझा) १२ १६ ० ०
मनन वाेेहरा त्रि. गाे. बाेल्ट ५ ९ १ ०
शाॅन मार्श त्रि.गाे. भुवनेश्वरकुमार १ ४ ० ०
जाॅर्ज बेली झे. शर्मा गाे. हेनरिक्स २२ १६ ३ ०
डेव्हिड मिलर झे. बाेल्ट गाे. शर्मा १५ १४ १ ०
साहा झे. प्रवीणकुमार गाे. बाेल्ट ४२ ३३ २ १
अक्षर पटेल त्रि.गाे. बाेल्ट १७ १३ ० १
शिखर धवन पायचीत गाे. भुवनेश्वर ४ ६ ० ०
मिशेल जाॅन्सन नाबाद ४ ६ ० ०
अनुरीत सिंग झे. वाॅर्नर गाे. प्रवीण ० २ ० ०
संदीप शर्मा नाबाद १ १ ० ०
अवांतर : ७. एकूण : २० षटकांत ९ बाद १३० धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-१०, २-१३, ३-४५, ४-५३, ५-७२, ६-११६, ७-१२३, ८-१२६, ९-१२७. गोलंदाजी : ट्रेंट बाेल्ट ४-०-१९-३, भुवनेश्वरकुमार ४-०-२३-२, प्रवीणकुमार ४-०-३४-१, कर्ण शर्मा ४-०-२२-१, हेनरिक्स ४-०-३०-१.
सामनावीर : ट्रेंट बोल्ट