आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ipl 8 31st Match Delhi Daredevils V Kings Xi Punjab At Delhi

दिल्लीचा विजयी चौकार, श्रेयस आणि मयंक यांची शतकी भागीदारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली - सलामीवीर श्रेयस अय्यर अन् मयंक अग्रवाल यांनी केलेल्या १०६ धावांच्या शतकी भागीदारीमुळे िदल्ली डेअरडेव्हिल्सने गत उपविजेत्या किंग्ज इलेव्हन पंजाबचा गड्यांनी दणदणीत पराभव करून आयपीएलच्या आठव्या सत्रात चौथ्या िवजयाची नोंद केली.
श्रेयसने चार चाैकार तीन षटकारांच्या मदतीने ५४ धावा तडकावल्या तर मयंकने सहा चौकार एका उत्तुंग षटकारासह ५२ धावांची खेळी केली. किंग्ज इलेव्हन पंजाबने आधी फलंदाजी करताना २० षटकात फलंदाज गमावून ११८ अशा साधारण धावसंख्येचे आव्हान िदले. प्रत्युत्तरात िदल्लीने एक फलंदाज गमावून ११९ धावांचे विजयी लक्ष्य गाठले. धारदार मारा करून २० धावात चार बळी घेणाऱ्या िदल्लीच्या नॅथन कुल्टर नाईलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
फिरोझशाह कोटला मैदानावर िदल्लीला या आधीच्या सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून १० गड्यांनी सडकून मार बसला होता. मात्र, शुक्रवारी या संघाच्या खेळात सकारात्मक परिवर्तन िदसून आले. तत्पूर्वी डेअरडेव्हिल्सचे मुख्य गोलंदाज अनुभवी झहीर खानने दोन आणि नाईलने चार बळी िमळवून पंजाबच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्यानंतर युवा सलामी फलंदाजांनी संघाला िवजय िमळवून िदला. अय्यरने ३८ चेंडूत अर्धशतक झळकावले तर अग्रवालने ३९ चेंडूत अर्धशतकी खेळी केली. अय्यरला शार्दुल ठाकूरने अक्षर पटेलकरवी झेलबाद केले. त्यानंतर मैदानात आलेल्या सौरभ ितवारी अन् मयंक अग्रवालने िदल्लीला १३.५ षटकात विजय मिळवून िदला. तिवारी पाच धावांवर नाबाद राहिला. त्याआधी पंजाबच्या डावात डेव्हीड मिल्लरने ४२, कर्णधार जाॅर्ज बेलीने १८ आणि अक्षर पटेलने २२ धावा ठोकल्या. िकंग्जचे अव्वल चार फलंदाज केवळ १० धावांच्या आत तंबूत परतले होते. मिल्लरने संघाला १०० धावांचा आकडा पार करून िदला.
कोल्टर नाइलचे अभिनंदन करताना दिल्ली संघातील सहकारी.

कॅन्सर जागृतीसाठी जांभळा पोशाख घालून खेळ केला
संघाने एक मे या िदवसाला लॅव्हेंडर डे असे नाव िदले आहे. लॅव्हेंडर हे जांभळ्या रंगाचे रोपटे असते. या रोपट्याला संपूर्ण जगात कॅन्सर पीडितांचा रंग म्हणून मान्यता िमळाली आहे. कॅन्सरबाबत जागरूकता निर्माण करून शिक्षणाचा पुरस्कार हाच जांभळा पोशाख घालण्याचा मुख्य उद्देश होता.
िदल्लीच्या खेळात शिस्त : िदल्लीडेअरडेव्हिल्सच्या खेळात या सामन्यात शिस्त िदसून आली. बंगळुरूकडून झालेल्या मानहानीजनक पराभवापासून धडा घेत या सामन्यात गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या ितन्ही आघाड्यांवर सरस कामगिरी केली. सर्वच खेळाडूंचा मैदानावरील वावर आत्मविश्वासपूर्ण होता.

किंग्स इलेव्हन धावा चेंडू ४ ६
सहवाग झे.मैथ्यूज गो. जहीर १ २ ० ०
मनन वोहरा झे.जाधव गो. जहीर १ ७ ० ० शॉन मार्श पायचित गो. डुमिनी ५ ४ १ ० साहा झे. जाधव गो.नाइल ३ ८ ० ०
मिलर झे. तिवारी गो. नाइल ४२ ४१ ४ १ जॉर्ज बेली गो.मिश्रा १८ १६ ३ ०
परेरा झे. तिवारी गो. नाइल ३ ७ ० ०
अक्षर पटेल झे. अग्रवाल गो. नाइल २२ २६ ० १
शार्दुल ठाकूर नाबाद ७ ६ १ ० अनुरीत सिंह नाबाद ८ ३ ० १
अवांतर : ०८. एकूण : २० षटकांत ८ बाद ११८ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-१, २-६, ३-१०, ४-१०, ५-३७, ६-४५, ७-१०२, ८-१०४
गोलंदाजी : जहीर खान ४-०-१७-२, जेपी ड्युमिनी ४-०-१५-१, नाथन कुल्टर नाइल ४-०-२०-४, अमित मिश्रा २-०-१०-१, ए. मॅथ्यूज ३-०-१९-०, इमरान ताहीर ३-०-३६-०.
िदल्ली डेयर डेविल्स धावा चेंडू ४ ६
मयंक अग्रवाल नाबाद ५२ ४० ६ १
श्रेयस अय्यर झे.पटेल गो. ठाकुर ५४ ४० ४ ३
सौरभ तिवारी नाबाद ५ ४ १ ०
अवांतर : ८. एकूण : १३.५ षटकांत १ बाद ११९ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-१०६
गोलंदाजी : संदीप शर्मा ३-०-१०-०, शार्दुल ठाकूर ३-०-३८-१, अनुरीत सिंह ३-०-२४-०, तिषारा परेरा २-०-२२-०, अक्षर पटेल २.५-०-२३-०