आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL 8 32nd Match Mumbai Indians Win Vs Rajasthan Royals

थरारक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा मुंबईकडून ८ धावांनी पराभव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अंबाती रायडू याची ५३ धावांची नाबाद खेळी आणि मैक्लिंघन (३ बळी) याच्या घातक गोलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल ८ मध्ये ितसरा विजय मिळवला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या थरारक सामन्यात मुंबईने राजस्थानचा ८ धावांनी पराभव केला. मुंबईने प्रथम फलंदाजी करीत निर्धारित २० षटकांत पाच गडी गमावून १८७ धावांचा आव्हानात्मक स्कोअर उभा केला. प्रत्युत्तरात राजस्थानच्या संघाला २० षटकांत सात गडी गमावून फक्त १७९ धावाच करता आल्या.
आठ सामन्यातील मुंबईचा हा ितसरा विजय आहे. तर राजस्थानचा दहा सामन्यातील तिसरा पराभव आहे. राजस्थान रॉयल्सने या सामन्यासाठी संघात दोन बदल केले होते. ते त्यांना खूप महागात पडले. जेम्स फॉकनरच्या जागी ज्वॉन थेरॉन तर प्रवीण तांबेऐवजी अंकित शर्मा यांना संधी देण्यात आली होती. मुंबईला अजून सहा सामने तर राजस्थानला चार सामने खेळायचे आहेत.
धावफलक
मुंबई इंिडयन्स धावा चेंडू ४ ६
सिमंस पायचित अंकित शर्मा ३८ ३१ ४ १
पटेल झे. व गो. कुलकर्णी २३ १४ ५ ०
उन्मुक्त चंद झे. बिन्नी गो. साउदी १३ १४ १ ०
रोहित झे. अंकित गो. कुलकर्णी २७ २१ २ १
रायडू नाबाद ५३ २७ ४ ३
पोलार्ड झे. सैमसन गो. थेरोन २४ १४ २ १
हरभजन नाबाद ० ० ० ०
अवांतर : ०९. एकूण : २० षटकांत ५ बाद १८७ धावा.
गडी बाद होण्याचा क्रम : १-४३, २-७३, ३-८४, ४-१२०, ५-१८१
गोलंदाजी : साउदी ४-०-३६-१, धवल कुलकर्णी ३-०-२६-२, थेरोन ४-०-४०-१, वाटसन ३-०-३६-०, बिन्नी २-०-१७-०, अंकित शर्मा ४-०-२९-१.

राजस्थान रॉयल्स धावा चेंडू ४ ६
रहाणे झे. रायडू गो. विनय १६ १२ २ ०
वाटसन ित्र. गो. सुचिथ २८ २३ २ २
सैमसन झे. सुचिथ गो. मैक्लिंघन ७६ ४६ ७ ३
स्मिथ झे. हरभजन गो. मैक्लिंघन २३ २० २ ०
नायर झे. पटेल गो. मैक्लिंघन ७ ६ १ ०
बिन्नी नाबाद ९ ६ १ ०
हुडा झे. उन्मुक्त गो. मलिंगा १ २ ० ०
साउदी धावबाद ६ ५ ० ०
थेरोन नाबाद १ १ ० ०
अवांतर : १२. एकूण : २० षटकांत ७ बाद १७९ धावा.
गडी बाद होण्याचा क्रम : १-३०, २-७१, ३-१२७, ४-१६१, ५-१६१ , ६-१६२, ७-१७७
गोलंदाजी : मैक्लिंघन ४-०-३१-३, मलिंगा ४-०-३४-१, विनय ४-०-३९-१, सुचिथ ४-०-३९-१, हरभजन ४-०-३४-०.