आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL 2015 Player Auction To Be Held On February 16 In Bangalore

16 फेब्रुवारीला बंगळूरू येथे होणार IPL 8 च्या खेळाडूंचा लिलाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळूरू - इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) च्या आठव्या सीझनसाठी खेळाडूंचा लिलाव 16 फेब्रुवारी रोजी बंगळूरू येथे आयोजित करण्यात आला आहे.
प्रत्येक संघातील खेळाडूंची निवड करण्याची अंतिम तारीख 4 फेब्रुवारी करण्यात आल्यानंतर लिलवासाठी जाणा-या खेळाडूंची संख्या अजून निश्चित करण्यात आलेली नाही. लिलावामध्ये जाणा-या खेळाडूंमध्ये यावेळी युवराज सिंग, दिनेश कार्तिक, केविन पीटरसन आणि हाशिम अमला या दिग्गज खेळाडूंची नावे असल्याचे बोलले जात आहे. आयपीएल-8 साठी या खेळाडूंची बेस प्राइज 2 कोटी रूपये एवढी ठेवण्यात आली आहे.
संघाच्या मालकांना मागच्या लिलावातील शिल्लक रक्कम आणि खेळाडूंना रिलीज करण्यासाठी देण्यात आलेल्या रकमेसोबत 3 कोटी रूपयांचा अतिरिक्त खर्च करण्याची सुट देण्यात आली आहे. यावेळी आयोजित करण्यात आलेला लिलावाचा कार्यक्रम एक दिवस चालणार आहे. मागच्यावेळी हा कार्यक्रम दोन दिवस आयोजित करण्यात आला होता.