'आयपीएल-8' स्पर्धा चांगलीच रंगात आली आहे. क्रिकेटमधील टी-20 फॉर्मेट हा फलंदाजांचा खेळ समजला जातो. 20 षटकांत काही संघ 200 पर्यंत धावसंख्या उभी करतात. काही दिग्गज फलंदाज सेन्चुरी तर काही हाफ सेन्चुरी ठोकतात. टी-20 क्रिकेटमध्ये हाफ सेन्चुरी ही सेन्चुरीच्या बरोबरीने असते. 40+ हा उत्कृष्ट स्कोर मानला जातो.
यंदा अनेक भारतीय
किकेटपटूंचा परफॉर्मन्स शानदार राहिला. परंतु, अद्याप काहींना हाफ सेन्चुरी करता आली नाही आहे.
टीम इंडियातील स्टार क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपरकिंग्जचा ऑलराउंडर रवींद्र जडेजा आघाडीवर आहे.
रवींद्र जडेजाने 104 सामने खेळले असून एकूण 1350 धावा केल्या आहेत. परंतु, आयपीएलमध्ये त्याला आतापर्यंत हाफ सेन्चुरी करण्याची संधी मिळाली नाही. जडेजाचा बेस्ट स्कोर 48 आहे. 2012 मध्ये झालेल्या 'आयपीएल-5'मध्ये जडेजाने 10 सामन्यात 99 धावा ठोकल्या होत्या. जडेजा राजस्थान रॉयल्स आणि कोची टस्कर्स केरला संघाकडून ही खेळताना दिसला होता. मात्र, 2012 पासून जडेजा चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळत आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, 'आयपीएल'मध्ये फिफ्टी न केलेल्या क्रिकेटपटूंविषयी...