आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL: दिल्लीचा हैदराबादवर 4 धावांनी सनसनाटी विजय, ड्युमिनी चमकला!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विशाखापट्टणम- आठव्या सत्राच्या आयपीएलमध्ये सुमार कामगिरीमुळे अडचणीत सापडलेला सनरायझर्स हैदराबाद संघाला घरच्या मैदानावर दिल्लीने 168 धावांचे आव्हान दिले होते. मात्र त्याचा पाठलाग करताना हैदराबादला 20 षटकात 8 बाद 163 धावाच करता आल्या. त्यामुळे दिल्लीने हैदराबादवर 4 धावांनी विजय मिळवला. दिल्लीचा कर्णधार जे पी ड्युमिनीने 3 षटकात 17 धावा देत हैदराबादचे 4 गडी बाद केले. त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.
सलामीवीर शिखर धवन (18) आणि डेव्हिड वॉर्नर (28 ) यांनी संघाला आश्वासक सुरुवात करून दिली. मात्र, दिल्लीचा कर्णधार ड्युमिनीने आपले पहिले व संघाचे सातवे षटक टाकले. या षटकात त्याने शिखर धवनला (18) त्रिफळाचित तर वॉर्नरला (28) आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. त्यानंतर खेळायला आलेल्या के. राहुलला 24 धावांवर मॅथ्यूजने त्रिफळाचित केले. राहुलने 21 चेंडूत 2 षटकारांसह 24 धावा केल्या. नमन ओझा (12)ला इमरान ताहीरने ड्युमिनीकडे झेलबाद केले. त्यानंतरही रवी बोपारा (41), आशीष रेड्डी (15) आणि कर्ण शर्मा (19) यांनी हैदराबादच्या विजयासाठी पुरेपूर प्रयत्न केला. हैदराबादला 6 चेंडूत 10 धावांची गरज होती. मात्र, दिल्लीचा गोलंदाज कोल्टर नाईलने शेवटच्या षटकात हैदराबादचे 2 गडी बाद करीत केवळ 5 धावा दिल्या. त्यामुळे दिल्लीने सनसनाटी असा केवळ 4 धावांनी विजय खेचून आणला. मयांक अगरवाल याने फिल्डींगचा जबरदस्त नजराणा पेश करीत कर्ण शर्माने ठोकलेला उत्तुंग फटका उंच उडी मारून मैदानात ढकलला व संघाच्या चार धावा वाचवल्या. अखेर त्या 4 धावांच दिल्लीसाठी उपयुक्त ठरल्या.
आज दुपारी दिल्लीचा कर्णधार जे पी ड्युमिनीने नाणेफूक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने निर्धारित 20 षटकात 4 बाद 167 धावा केल्या. सलामीवीर श्रेयस अय्यरने वेगवान अर्धशतक झळकावले. त्याने केवळ 40 चेंडूत 5 षटकार व 4 चौकाराच्या मदतीने 60 धावा काढल्या. तर कर्णधार ड्युमिनीने 41 चेंडूत 5 चौकार व 2 षटकारांसह 54 धावा ठोकल्या. युवराज सिंग 13 चेंडूत केवळ 9 धावावर बाद झाला. आशीष रेड्डीच्या गोलंदाजीवर वॉर्नरने युवराजचा अप्रतिम झेल टिपला. केदार जाधव ( 12 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारांसह नाबाद 19) आणि मॅथ्यूज (11 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 15 धावा) हे नाबाद राहिले.
त्याआधी मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने दिल्लीच्या सलामीचा फलंदाज मयांक अगरवाल याला केवळ 1 धावेवर बाद करून हैदराबादला दमदार सुरुवात करून दिली. कुमारच्या गोलंदाजीवर शिखर धवनने अगरवालचा झेल टिपला. त्यानंतर कर्णधार ड्युमिनी व सलामीवीर श्रेयस अय्यर यांनी 82 धावांची भागीदारी केली. अय्यर वेगाने धावा काढत होता मात्र तो प्रविणकुमारच्या एका स्लोवर चेंडूवर सोपा झेल देऊन बाद झाला.
दिल्लीच्या युवराज सिंगकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र आज पुन्हा तो साफ अपयशी ठरला. 13 चेंडू खेळताना त्याला केवळ 9 धावा काढता आल्या. हैदराबाद संघाने ट्रेंट बोल्टऐवजी डेल स्टेनचा संघात समावेश केला त्याने ड्युमिनीला 54 धावांवर त्रिफळाचित केले.
पुढे वाचा, आजच्या सामन्यात काय काय घडले...
बातम्या आणखी आहेत...