कोलकाता - शुभारंभाच्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) मुंबईला सात गड्यांनी पराभूत करत विजयाचे खाते खोलले. यावर्षीच्या आयपीएल हंगामातील पहिला सामना कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर)आणि मुंबई इंडियन्समध्ये ईडन गार्डन मैदानावर झाला. त्या वेळी केकेआर संघाचा मालक
शाहरुख खान त्याचा मुलगा अबरामसह मैदानावर होता. शाहरुखलाही दुडूदुडू धावणाऱ्या अबराममागे लहान होऊन धावावे लागले.