आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photo's : ऑस्ट्रेलियाला World Cup जिंकवणा-या स्टार्कची ग्लॅमरस Girlfriend

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - ख्रिसमसच्या वेळी मिशेल स्टार्क आणि एलिसा हिली. - Divya Marathi
फोटो - ख्रिसमसच्या वेळी मिशेल स्टार्क आणि एलिसा हिली.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा मिशेल स्टार्क सध्या चांगल्या फॉर्मात आहे. त्यांनी 24 एप्रिलला राजस्थानच्या विरोधात त्याने 22 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. त्यानंतर 26 एप्रिलला दिल्लीच्या विरोधात 20 धावा देत दोन बळी घेतले. दोन्ही सामन्यांत बेंगळुरुचा विजय झाला. स्टार्कने आयपीएलमध्ये -8 आतापर्यंत तीन सामन्यांत 7 विकेट घेतल्या आहेत. त्याचे श्रेय त्याने त्याची गर्लफ्रेंड एलिसा हिली हिला दिले आहे. एलिसा गेल्या दोन्ही सामन्यात त्याला चीअर करण्यासाठी मैदानात उपस्थित होती.

2014 मध्ये ऑस्ट्रेलियाला टी-20 वर्ल्ड कप जिंकवून दिला
हिली स्टार्कची गर्लफ्रेंड आहे त्याचबरोबर ती प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू इयान हिलीची पुतणीही आहे. विशेष म्हणजे तिही क्रिकेटपटू आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघात ती खेळते. 2014 मध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कप च्या विजेता महिला संघात ती ऑस्ट्रेलियाची विकेटकिपर होती. सेमिफाइनलमध्ये तिने 21 चेंडूत 30 धावा फटकावल्या होत्या. त्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 140 धावा केल्या होत्या. तर विंडिजला मात्र 132 धावाच करता आल्या.

वर्ल्ड कपदरम्यान स्टार्क होता एलिसाबरोबर
टी-20 वर्ल्ड कप-2014 मध्ये ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर पडल्यानंतर स्टार्क मायदेशी परतला होता. पण काही दिवसांतच तो परत बांगलादेशला आला होता. हिलीसोबत राहिल्यास तीची कामगिरी चांगली होईल आणि मलाही ते आवडेल, असे तो म्हणाला होता. आम्हाला पुढे जाता आला नाही, पण किमान हिलीच्या टीमने तरी वर्ल्ड कप जिंकावा असे तो म्हणाला, झालेही तसेच.

पुढील स्लाइड्सवर पाहा, स्टार्क आणि एलिसाचे काही निवडक PHOTO
-----------------------------------------------------------