(IPL-8 च्या ओपनिंग सेरेमनीत परफॉर्म करताना अभिनेता अनुष्का शर्मा )
कोलकाता- आयपीएल-8च्या रंगारंग उद्घाटन सोहळ्यात बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा, अभिनेता हृतिक रोशन आणि शाहिद कपूरने लाजवाब परफॉर्मस दाखवून रसिकांची मने जिंकली. कोलकात्यातील सॉल्टलेक स्टेडियमवर मंगळवारी हा सोहळा जल्लोषात पार पडला.
संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतावर भावपूर्ण नृत्य सादर करून सोहळ्याला सुरवात करून दिली. शाहिद कपूरने स्टेजपर बाइकवरून एंट्री केली. त्याने 'गंदी बात' आणि 'आयएम ए डिस्को डान्सर' सारख्या सुपरहिट गीतांवर डान्स केला. नंतर अनुष्का शर्मा स्टेजवर अवतरली. अनुष्काने अनेक गाण्यांवर नृत्य केले.
हृतिक मंचावर येताच चाहत्यांनी जोरदार जल्लोष केला. ह्रतिक रोशनने
आपले फेव्हरेट सॉन्ग 'एक पल का जीना'वर शानदार परफॉर्म करून फॅन्सचे मनोरंजन केले. कार्यक्रमाचे संचालन अभिनेता
सैफ अली खानने केले.
स्पर्धेतील सर्व आठ कर्णधारांना बोलावून त्यांना रवी शास्त्री यांनी स्पिरिट ऑफ क्रिकेटची शपथ दिली. दरम्यान 47 दिवस चालणार्या या टी-20 स्पर्धेचा पहिला सामना आज (बुधवारी) कोलकाता नाइट रायडर्स वि. मुंबई इंडियन्स यांच्यात होईल.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, IPL-8 च्या रंगारंग ओपनिंग सेरेमनीचे फोटो...