आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO: प्रीती झिंटाला आयपीएलच्या मैदानावर विवाहाचा प्रस्ताव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: प्रीती झिंटा आणि विवाहाचा प्रस्तावाचे बॅनर दाखवताना एक पंजाबी युवक)
आयपीएल-8 मधील पंजाबविरुद्ध हैदराबादच्या लढतीदरम्यान बॉलीवूडची अभिनेत्री प्रीती झिंटा दिसली. प्रीती पंजाब संघाची को- ऑनर असल्यामुळे ती आपल्या संघाला चीअर्स करण्‍यासाठी मोहालीतील स्टेडियमवर पोहोचली होती. स्टेडियमवरमधील क्रिकेट प्रेक्षकांना टीमचे टी-शर्ट देताना तिला एका पंजाबी तरुणाने विवाहाचा प्रस्ताव दिला. एवढेच नव्हे तर या तरुणाने आपल्यासोबत एक बॅनरही आणले होते. त्यावर 'प्रीती विल यू मॅरी मी.' असे लिहिले होते. 40 वर्षीय प्रीती झिंटा ही अद्याप सिंगल आहे.

नेस वाडियासोबत 'गुटूर गू'
किंग्ज इलेवन पंजाबचा सह-मालिक नेस वाडियासोबत प्रीती लिव-इन-रिलेशनशिपमध्ये होती. अनेक वर्षे दोघे डेटवरही जात होते. परंतु, नेसच्या आईने प्रीतीला रिजेक्ट केल्यामुळे दोघांच्या नात्यात मोठी दरी निर्माण झाली आहे. मागील वर्षी प्रीतीने नेसवर छेड काढल्याचा आरोप केला होता. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले होते.
दरम्यान, प्रीती सध्या एका अज्ञात व्यक्तीसोबत डेट करत आहे. आपल्या आयुष्यात एक चांगला व्यक्ती आला असून आपण आनंदी असल्याचे प्रीतीने आयपीएल-8 ला प्रारंभ होण्यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते.

(फोटो साभारः अश्विनी राणा)
प्रीतीची झलक पाहाण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...