आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RR vs KXIP : सुपर ओव्हरच्या संघर्षातून पंजाबने मिळवला राजस्थानवर विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद : किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्या विरोधातील सामना सुपर ओव्हरच्या थरारानंतर पंजाबने जिंकला. पंजाबने सुपर ओव्हरमध्ये 15 धावा केल्या. हे आव्हान राजस्थानला पार करता आले नाही, परिणामी त्यांचा पराभव झाला.
पंजाबने नाणेफेक जिंकत आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीला आलेल्या राजस्थानच्या राहणे आणि वॉटसन यांनी सलामीसाठी 95 धावांची भागीदारी केली. त्यावेळी राजस्थान सहज 200 च्या पुढे मजल मारणार असे वाटत होते. पण त्यानंतर एकापाठोपाठ विकेट गेल्याने राजस्थानला मोठी मजल मारता आली नाही. पण अखेरच्या षटकात बिन्नीने केलेल्या फलंदाजीच्या जोरावर राजस्थानने 191 पर्यंत मजल मारली.
गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या राजस्थान संघाच्या नावे एकूण १० गुण आहेत. दुसरीकडे पंजाबचा संघ चारपैकी तीन पराभव आणि एका विजयासह सहाव्या स्थानी आहे. या टीमच्या नावे दोन गुण आहेत. दोन्ही टीमच्या कामगिरीमध्ये मोठे अंतर आहे. राजस्थानचे सर्वच खेळाडू सध्या जबरदस्त फॉर्मात आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाबकडेही जॉर्ज बेली, ग्लेन मॅक्सवेल आणि मिशेल जॉन्सनसारखे तगडे खेळाडू आहेत. संघाचा पराभव टाळण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी करण्याची क्षमता या खेळाडूंमध्ये आहे.

राजस्थान टीमला सलग पाच विजय मिळवून देण्यात ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा मोठा वाटा आहे. यात ऑलराउंडर शेन वॉटसनसह कसोटी कर्णधार स्टीवन स्मिथ आणि जेम्स फॉकनरसारख्या खेळाडूंनी गोलंदाजीसह फलंदाजीतही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राजस्थान संघाने गत सामन्यात चेन्नईवर आठ गड्यांनी मात केली.
दोन्ही संघ -
राजस्थान रॉयल्स - अजिंक्य रहाणे, शेन वाॅटसन, स्टीव्ह स्मिथ, केके नायर, संजू सॅमसन, स्टुअर्ट बिन्नी, हुडा, जेम्स फॉकनर, ख्रिस मॉरीस, प्रवीण तांबे, राहुल तेवातिया

किंग्ज इलेव्हन पंजाब - मुरली विजय, वीरेंद्र सेहवाग, वृद्धिमान शहा, ग्लेन मॅक्सवेल, शॉन मार्श, डेव्हिड मिलर, मिशेल जॉन्सन, अनुरीत सिंग, शिवम शर्मा, संदीप शर्मा, अक्षर पटेल