आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल 8 : आज मुंबई इंडियन्सचा सामना नाइट रायडर्ससोबत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - गतविजेता कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात बुधवारी होणार्‍या सामन्याने आयपीएल-८ च्या थराराला सुरुवात होईल. कोलकाता दोन वेळा (२०१२, २०१४) आणि मुंबई इंडियन्स (२०१३) एक वेळा विजेता ठरला आहे.

सलामीच्या लढतीत सर्वांच्या नजरा कोलकाताचा फिरकीपटू सुनील नरेनवर असतील. नरेनच्या गोलंदाजी शैलीला क्लीन चिट मिळाल्यास केकेआरने या वर्षी आयपीएलमधून दूर होण्याची धमकी दिली होती. दमदार फिरकीपटू हेच सध्या केकेआरचे शक्तिस्थान दिसत आहे.

आयपीएलचा सर्वाधिक महागडा संघ मुंबईकडे स्टार फलंदाजांची कमी नाही. त्यांचे रोहितशिवाय कोरी अँडरसन, केरोन पोलार्ड, लेंडल सिमन्स आणि अंबाती रायडू विरोधी संघांना त्रस्त करू शकतील. कर्णधार रोहितसाठी ईडन गार्डन लकी ठरले आहे. येथेच त्याने श्रीलंकेविरुद्ध २६४ धावांची वनडेतील सर्वोच्च खेळी केली होती.