आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL 8 Royal Challengers Bangalore V Sunrisers Hyderabad

RCB Vs SH : हैदराबादचा बंगळुरूवर 8 गडी राखून विजय, शिखर, वॉर्नरची अर्धशतके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ठेवलेल्या 167 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादने 8 गडी राखून सामना खिशात घातला आहे. शिखर धवन आणि कर्णधार डेव्हीड वॉर्नर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर हैदराबादने विजय साकार केला.
सलामीवीर डेव्हीड वॉर्नरने तुफानी फटकेबाजी केली. त्याने अवघ्या 24 चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकत सामन्यावर पकड मजबूत केली आहे. सात षटकात बेंगळुरुला एकही विकेट घेता आली नव्हती. पण चांगल्या सुरुवातीनंतर चहलने वॉर्नर आणि विल्यमसनला बाद करत हैदराबादला दोन धक्के दिले. पण त्यानंतर हैदराबादच्या एकाही फलंदाजाला बाद करण्यात त्यांना यश आले नाही.
त्याआधी बेंगळुरूचा संपूर्ण संघ 166 धावांत गारद झाला. डिव्हिलियर्सने सर्वाधिक 46 तर कोहलीने 41 धावा केल्या. तर हैदराबादच्या बोल्टने तीन आणि भुवनेश्वर आणि बोपाराने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
21 धावा काढून गेल बाद -
आरसीबीला पहिला झटका गेलच्या रुपात लागला. सहाव्या ओव्हरमध्ये प्रवीण कुमारच्या बॉलवर गेल बाद झाला. गेलने 16 बॉलमध्ये 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 21 धावा केल्या. त्यानंतर दिनेश कार्तिक संघाची धावसंख्या 77 असताना बाद झाला. 12 व्या षटकाच्या अखेरच्या दोन चेंडूंवर रवी बोपाराने दोन बळी मिळवत हैदराबादला दिलासा दिला. प्रथम त्याने कोहलीचा त्रिफळा उडवला. त्यानंतर आलेल्या मंदीपचा पुढच्याच चेंडूवर वॉर्नरले एक अत्यंत अप्रतिम असा झेल घेतला. त्यापाठोपाठ सॅमीला बाद करत पाच फलंदाज तंबूत परतवले आहेत. त्यानंतर बोल्टच्या एकाच षटकात तीन बळी गेले. डिव्हिलियर्स अबॉट आणि पटेल यांना त्याने तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतरल भुवनेश्वरने अखेरच्या षटकात दोन विकेट घेत शेपूट गुंडाळले.

हैदराबादचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सनरायझर्सच्या तुलनेत बंगळुरूची टीम अधिक उजवी आणि मजबूत दिसत आहे. बंगळुरूच्या नावे सध्या एक विजय, तर हैदराबादच्या नावे एक पराभव आहे.
दोन्ही संघ
आरसीबी : क्रिस गेल, विराट कोहली, दिनेश कार्तिक, एल्बी डिव्हिलर्स, मंदीप सिंह, डॅरेन सॅमी, सीन एबॉट, हर्षल पटेल, यजुवेंद्र चहल, वरुण अ‍ॅरोन आणि अबु नचीम
सनरायझर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर, शिखर धवन, केएल राहुल, रवी बोपरा, नमन ओझा, केन विल्यम्सन, आशीष रेड्डी, करण शर्मा, प्रवीण कुमार, भुवनेश्वरकुमार, ट्रेंट बोल्ट