आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL 8: Smith, Rahane Take Rajasthan Royals To 7 Wicket Win Over Mumbai Indians

Only 16 , \'हाइट\'वरून सोशल मीडियात चाहत्यांनी पार्थिवची खेचली टांग!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: एका चाहत्याने न्यूझीलंडमधील क्रिकेटचे मैदान हे पार्थिव पटेलच्या बेड पेक्षाही छोटे असल्याचे म्हटले आहे. परंतु, चाहत्याने पार्थिवची माफी देखील मागितली.)
राजस्थान रॉयल्सने मंगळवारी मुंबई इंडियन्सचा सात विकेट राखून फाडशा पाडला. अहमदाबादेत सरदार पटेल स्टेडियमवर ही लढत झाली. मुंबईकडून पहिल्यांदा ओपनिंगसाठी मैदानात उतरलेला पार्थिव पटेल फक्त 16 धावा ठोकून तंबूत परतला. त्यानंतर मात्र, सोशल साइट्सवर पार्थिवच्या 'हाइट'वरुन क्रिकेट चाहत्यांनी त्याची चांगलीच टांग खेचली. पार्थिव पटेल उंचीने ठेंगणा असल्याने क्रिकेट चाहत्यांनी त्याच्या 'हाइट'ला टार्गेट केले आहे.
राजस्थान रॉयल जबरदस्त फॉर्मात...
जबरदस्त फॉर्मात असलेल्या राजस्थान रॉयल्सने आयपीएल-8 मध्ये विजयाची हॅटट्रिक केली. दुसरीकडे सुमार कामगिरी करणार्‍या मुंबई इंडियन्सला सलग तिसर्‍या पराभवाला सामोरे जावे लागले.

केरोन पोलार्ड (70) आणि कोरी अँडरसन (50) यांच्या झंझावाती फलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद १६४ धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात स्टीव्हन स्मिथ (नाबाद 79) आणि जेम्स फॉकनर (नाबाद 6) यांच्या अभेद्य 52 धावांच्या भागिदारीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने 19.1 षटकांत सामना खिशात घातला.
सोशल मीडियात पार्थिव पटेलवर करण्यात आलेल्या विनोदी कमेंट्‍स पाहाण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइडवर...