स्पोर्ट्स डेस्कः ऑस्ट्रेलियाचा तुफानी बॉलर मिचेल स्टार्कपासून ते तरूण किवी बॉलर ट्रेंट बोल्टपर्यंत हे सर्व बॉलर्स आयपीएलमध्ये
आपल्या घातक बॉलिंगने अनेक चांगल्या बॅट्समनला पवेलियनमध्ये पोहचवण्यासाठी तयार आहेत. क्रिकेट फॅन्ससाठी पर्वणी असलेल्या या आयपीएलमध्ये बॅट आणि बॉलचे घमासान युध्द होणार आहे. एकीकडे वर्ल्डकपमध्ये जिथे एकापाठोपाठ दोन शतक लगावण्यात आले, तिथेच स्टार्क आणि बोल्टने 22-22 विकेट घेऊन सामन्यांमध्ये आपले वर्चस्व दाखवले. श्रीलंकेचे यॉर्कर किंग लसिथ मलिंगा वर्ल्डकपमधील निराशाजनक प्रदर्शनाला विसरून यंदाच्या आयपीएलमध्ये धमाकेदार प्रदर्शन करण्यासाठी तयार आहे. आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी बॉलरबद्दल बोलायचे झाल्यास तर मलिंगाचेच नाव वरती येते. त्याने आतापर्यंत 83 सामन्यात 119 विकेट मिळवल्या आहेत. याच दरम्यान त्याने 13 रन देऊन पाच विकेट मिळवले होते.
टॉप-10 मध्ये आहेत 7 भारतीय
बॅटींगप्रमाणेच बॉलिंगमध्येही भारतीयांचा दबदबा आहे. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलर्सच्या TOP-10 लिस्टमध्ये सात भारतीय बॉलर्सचा समावेश आहे. यामध्ये अमित मिश्रा, हरभजन सिंह, पीयूष चावला, प्रज्ञान ओझा, आर. अश्विन, आरपी सिंह आणि विनय कुमार हे सर्वाधिक विकेट पटकावणारे बॉलर्स ठरले आहेत. Divyamarathi.com तुम्हाला आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या टॉप-10 बॉलर्सबद्दल सांगत आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, हे आहेत टॉप-10 बॉलर्स ज्यांनी सर्वात जास्त विकेटी घेतल्या आणि सर्वोक्तृष्ट प्रदर्शनही केले