आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘प्लेे ऑफ’चे आयोजन बीसीसीआय करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- येत्या १९ मे रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणारा आयपीएल ‘प्लेे ऑफ’ क्रिकेट सामना फ्रॅन्चायझीच्या मालकीचा नसून या सामन्याचे आयोजन बीसीसीआय करणार आहे. या सामन्याच्या तिकिटांच्या थेट आणि संगणकीकृत तिकीट विक्रीला राज्य शासनाने नियम आणि अटी घालून परवानगी दिली आहे. त्यानुसार बीसीसीआयला वानखेडे स्टेडियमच्या ३२ हजार ७८८ या आसनक्षमतेवर ऑनलाइन तिकीट विक्रीचा रु. १० हा अधिक देय करमणूक कर (शुल्क) बीबीसीआयला भरावा लागणार आहे. त्या व्यतिरिक्त राज्य शासनाचा २५ टक्के करमणूक करही बीसीसीआयला भरावा लागेल.
ऑनलाइन तिकीट विक्रीचे देय करमणूक शुल्क ३ लाख २७ हजार ७८८ ही रक्कम सामन्याच्या एक दिवस आधी बीसीसीआयला जिल्हाधिकारी कार्यालयात भरावी लागणार आहे. मात्र शासनाच्या करमणूक कराच्या २५ टक्के एवढ्या रकमेचा भरणा सामन्यानंतर करावा लागणार आहे.

तिकीट मूल्याच्या २५ टक्के करमणूक कराचा भरणा शासनाच्या तिजोरीत जमा होतो खरा, मात्र क्रिकेट संघटना, तिकीट मूल्य कमी दाखवून कमी करमणूक कर भरण्याची कल्पकता दाखवू लागल्या आहेत. कारण शासनाने सन्मानिकांची (कॉम्प्लिमेंटरी पासेस) संख्यादेखील निश्चित केल्यामुळे त्यापेक्षा अधिक सन्मानिकांवर त्या स्टँडसच्या अन्य प्रेक्षकांना देण्यात येणाऱ्या तिकीट मूल्याचा आधार घेत २५ टक्के करमणूक कर लावण्यात येतो. मात्र शासनाच्या या चपळाईला क्रिकेट संघटनांनीदेखील धूर्तपणे प्रत्युत्तर दिले आहे. आपापल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना व अन्य व्यक्तींना उपकृत करण्यासाठी अशा सन्मानिकांऐवजी अत्यल्प दराची तिकिटे देण्याची प्रथा सुरू झाली आहे. त्यामुळे शंभर रुपयांसारखे अत्यल्प मूल्य या तिकिटांचे ठरवून ती तिकिटे कार्यकर्त्यांना मात्र विनामूल्य देण्यात येतात.

बातम्या आणखी आहेत...