आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ipl 8 We Need To Keep The Momentum Going Says Muttiah Muralitharan

विजयाची लय कायम ठेवावी लागेल : मुथय्या मुरलीधरन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- आयपीएलच्या आठव्या सत्रात अंतिम चार संघांमध्ये स्थान मिळवण्यासाठी निकराने लढत देत विजयी लय कायम ठेवावी लागेल, अशी प्रतिक्रिया सलग तीन विजय मिळवून बाद फेरी गाठण्याची शक्यता बळकट करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादचे गोलंदाजी प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरन यांनी दिली.
आता एकच विजय सनरायझर्सला बाद फेरीत स्थान मिळवून देऊ शकतो, असे श्रीलंकेचा माजी गोलंदाज मुरलीधरनला वाटते.

घरच्या मैदानावर दोन्ही लढती
सनरायझर्स हैदराबादला यानंतरच्या दोन्ही लढती घरच्या मैदानावर खेळायच्या असल्यामुळे ही आमच्यासाठी जमेची बाजू म्हणता येईल. आम्हाला खेळपट्टीच्या स्वरूपाबाबत पूर्ण माहिती असल्यामुळे आम्ही त्यानुसार योजना बनवून गोलंदाजी व क्षेत्ररक्षणाची रचना करू शकतो, असेही मुरलीधरनने स्पष्ट केले.