आयपीएल-8 मधील सगळ्यात महागडा क्रिकेटपटू युवराज सिंह पुन्हा एकदा अॅक्शनमध्ये दिसला. मैदानावर पिवळ्या जर्सीमध्ये नेटवर युवीने कसून सराव केला. युवीला दिल्ली डेअरडेव्हिल्सने सुमारे 16 कोटी रुपयांत खरेदी केले आहे.
युवी, जहीर खानसह दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या क्रिकेटपटूंनी सोमवारी फिरोटशाह कोटला स्टेडिअमवर कसून सराव केला. दीर्घकाळापासून
टीम इंडियामधून बाहेर असलेला स्फोटक फलंदाज युवराजसिंग आणि वेगवान गोलंदाज जहीर खानला पुनरागमनाची आशा आहे. त्यामुळे आयपीएलमधील चमकदार कामगिरी करण्यावर दोघांचा जोर असणार आहे. दिल्ली डेअरडेविल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज 9 एप्रिलला आमनेसामने येतील.
युवीवर असेल सगळ्यांचे लक्ष...
युवी हा आयपीएलच्या आठव्या हंगामातील सगळ्यात महागडा क्रिकेटपटू ठरला आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने युवीला सुमारे 16 कोटींमध्ये खरेदी केले आहे. त्यामुळे युवी यंदाच्या आयपीएलमध्ये कसा खेळतो, याकडे सगळ्यांचे लक्ष राहाणार आहे. दुसरीकडे, यंदाच्या आयपीएलमध्ये चकमदार कामगिरी करून युवी टीम इंडियातील पुनरागमनासाठी प्रयत्न करणार आहे. कारण त्याच्यासाठी ही अंतिम संधी आहे, अशी जोरदार चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, युवीला 2012 मध्ये 'कॅन्सर' या दुर्धर आजाराने ग्रासले होते. युवीने अमेरिकेला उपचार घेतले. कॅन्सर पहिल्या टप्प्यात असल्यामुळे त्याने मोठ्या हिंमतीने आजारावर मात केली.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, युवीसह अन्य क्रिकेटपटूंचे प्रॅक्टिस सेशनचे फोटो...