आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL: भयापुढे विजय आहे : वीरू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सर व्हिव्हियन रिचर्ड्स दिल्ली डेअरडेव्हिल्सचे सल्लागार बनल्यामुळे आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवाग जाम खुश आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध विजयाचे श्रेय सेहवागने रिचर्ड्स यांनी दिलेल्या टिप्सना आणि त्यांच्या मार्गदर्शनाला दिले. रिचर्डस् यांच्या सल्ल्यामुळे आत्मविश्वास वाढला, असे वीरू म्हणाला. या सामन्यात सेहवागने नाबाद 95 धावांची खेळी केली. आयपीएल-6 मध्ये हा आतापर्यंतचा सर्वोत्तम स्कोअर ठरला. वीरू म्हणाला, ‘मला वाटले की मी चांगल्या फॉर्मात आहे. व्हिव रिचर्डस् यांनी चकवा देण्याचा सल्ला दिला होता. एखादा फलंदाज आतून घाबरलेला असला तरीही त्याने आपण आत्मविश्वासाने भरलेलो असल्याचे दाखवले पाहिजे. याचा फायदा झाला. मी चांगली फलंदाजी करतो त्या वेळी सामन्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न असतो. या सामन्यात हवा दिल्लीच्या बाजूने वाहत होती असे तुम्ही म्हणू शकता. सहा पराभवांनंतरही आम्ही कठोर सराव आणि फिटनेसवर लक्ष दिले,’ असेही त्याने नमूद केले.


हेही महत्त्वाचे
*अ‍ॅरोन फिंच (42 चेंडूंत 64 धावा) आयपीएल-6 मध्ये तिसरे अर्धशतक काढणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्याशिवाय रोहित शर्मा, गौतम गंभीर आणि विराट कोहलीने अशी कामगिरी केली आहे.
*यंदाच्या आयपीएलमध्ये एक कर्णधार म्हणून पदार्पण करताना फिंचची ही कामगिरी सर्वोत्तम ठरली आहे.
*या स्पर्धेत गेलच्या नावे 17 षटकार तर रोहित शर्माच्या नावे 15 आणि विराट कोहलीच्या नावे 11 षटकार जमा झाले आहेत.
*मनदीपने (नाबाद 77) यंदाच्या स्पर्धेत किंग्ज इलेव्हन पंजाबकडून पहिले अर्धशतक ठोकले. या स्पर्धेतील सहा सामन्यांत त्याच्या नावे आता 170 धावा झाल्या आहेत.
*अ‍ॅरोन फिंचच्या नावे या स्पर्धेत पाच सामन्यांत 212 धावा (42.40 च्या सरासरीने) झाल्या आहेत.