आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ipl Auction Mumbai Indians Purchased Ricky Pointing

आयपीएलमध्‍ये सचिन-पॉटिंग खेळणार एकत्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्‍नई- आयपीएल-6 च्‍या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव सुरू असून ऑस्‍ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंग मुंबई इंडियन्‍सकडून खेळणार आहे. मुंबई इंडियन्‍सने पॉटिंगला 4 लाख डॉलरला खरेदी केले आहे. पॉटिंगची आधार किंमत ही 4 लाख डॉलर इतकी होती. आयपीएल 6 मधील खेळाडूंच्‍या लिलावात आतापर्यंतची सर्वात मोठी बोली ऑस्‍ट्रेलियाच्‍या ग्‍लेन मॅक्‍सवेलवर लावण्‍यात आली. मुंबई इंडियन्‍सने त्‍याला 5.2 कोटी रूपयांत खरेदी केले.

खाली खेळाडूचे नाव, त्‍याला मिळालेली किंमत आणि संघाचे नाव देण्‍यात आलेले आहे.

--- श्रीलंकन विकेटकिपर कुसल परेरा- 50 हजार डॉलर- राजस्‍थान रॉयल्‍स

--- रेयॉन मॅकलेरन- 50 हजार डॉलर- केकेआर

--- वेस्‍ट इंडिजचा मध्‍यमगती गोलंदाज जेसन होल्‍डर- 2 लाख डॉलर- चेन्‍नई सुपरकिंग्‍ज

--- श्रीलंकन फिरकीपटू अकिला धनंजय- 2 लाख डॉलर- चेन्‍नई सुपरकिंग्‍ज

--- ऑस्‍ट्रेलियाचा डॅनियल ख्रिश्चियन- 1 लाख डॉलर- रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू

--- दक्षिण अ‍ाफ्रिकन विकेटकिपर क्विंटन डी कॉक- 20 हजार डॉलर- हैदराबाद

--- न्‍यूझीलंडचा जेकम ओरम- 50 हजार डॉलर- मुंबई इंडियन्‍स

--- ऑस्‍ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्डसन- 7 लाख डॉलर- सहारा पुणे

--- ऑस्‍ट्रेलियाचा बेन लाफलिन- 2 लाख डॉलर- चेन्‍नई सुपरकिंग्‍ज

--- ऑस्‍ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज कोल्‍टर नील- 4 लाख 50 हजार डॉलर- मुंबई इंडियन्‍स

--- वेस्‍ट इंडिजचा अष्‍टपैलू ख्रिस्‍तोपर बार्नवले- 50 हजार डॉलर- रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू

--- श्रीलंकेचा फिरकीपटू सचित्रा सेनानायके- 6 लाख 25 हजार डॉलर- कोलकाता नाईट रायडर

--- दक्षिण आफ्रिकेचा अष्‍टपैलू ख्रिस मॉरिस- 6 लाख 25 हजार डॉलर- चेन्‍नई सुपरकिंग्‍ज

--- श्रीलंकेचा जीवन मेंडिस- 50 हजार डॉलर- दिल्‍ली डेअरडेव्हिल्‍स

--- न्‍यूझीलंडचा फिरकीपटू नॅथन मॅक्‍युलम- 1 लाख डॉलर- हैदराबाद

--- श्रीलंकन फिरकीपटू अजंता मेंडिस- 7 लाख 25 हजार डॉलर- पुणे वॉरियर्स--- जयदेव उनाडकत- 5 लाख 25 हजार डॉलर- रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू

--- पंकज सिंग- 1 लाख 50 हजार डॉलर- रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू

--- वेस्‍ट इंडिजचा रवि रामपॉल- 2 लाख 90 हजार डॉलर- रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू

--- मनप्रीत गोनी- 5 लाख डॉलर- किंग्‍ज इलेव्‍हन पंजाब

--- वेस्‍ट इंडिज फिडेल एडवर्ड्स- 2 लाख 10 हजार डॉलर- राजस्‍थान रॉयल्‍स

--- सुदीप त्‍यागी- 1 लाख डॉलर- हैदराबाद सनरायजर्स

--- डर्क नेनेस- 6 लाख डॉलर- चेन्‍नई सुपरकिंग्‍ज

--- न्‍यूझीलंडचा जेसी रायडर- 2 लाख 60 हजार डॉलर- दिल्‍ली डेअरडेव्हिल्‍स.

--- वेस्‍ट इंडिजचा कर्णधार डॅरेन सॅमी- 4 लाख डॉलर- हैदराबाद.

--- अभिषेक नायर- 6 लाख 75 हजार डॉलर- सहारा पुणे वॉरियर्स.

--- श्रीलंकेचा थिसारा परेरा- 6 लाख 75 हजार डॉलर- सनरायजर्स हैदराबाद.

--- ऑस्‍ट्रेलिया ग्‍लेन मॅक्‍सवेल- 5.2 कोटी रूपये- मुंबई इंडियन्‍स

--- वादग्रस्‍त खेळाडू पोमर्शबॅक- 3 लाख डॉलर- पंजाब

--- ऑस्‍ट्रेलियाचा फलंदाज फिलिप ह्यूग्‍ज- एक लाख डॉलर- मुंबई इंडियन्‍स

--- ऑस्‍ट्रेलियाचा अष्‍टपैलू जेम्‍स फॉल्‍कनर- 4 लाख डॉलर- राजस्‍थान रॉयल्‍स

--- ऑस्‍ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्‍लार्क- 4 लाख डॉलर- पुन्‍हा एकदा पुणे वॉरियर्स.

---- दक्षिण आफ्रिकेचा जोहान बोथा- 4.5 लाख डॉलर- दिल्‍ली डेअरडेव्हिल्‍स. गेल्‍यावर्षी राजस्‍थान रॉयल्‍सने 9.50 लाख डॉलर्सला खरेदी केले होते.

--- रिकी पॉटिंगला- 4 लाख डॉलर्स- मुंबई इंडियन्‍स.

--- डावखुरा वेगवान गोलंदाज आरपी सिंग- 4 लाख डॉलर्स- बेंगळूरू रॉयल चॅलेंजर्स.

या लिलावात खेळाडूंशी फक्‍त एका वर्षासाठी करार करण्‍यात येणार आहे. आयपीएल गर्व्‍हनिंग काऊंसिलने खेळाडूंना खरेदीसाठी संघांना एक रक्‍कम निश्चित करण्‍यात आली आहे. एका संघाला 11 विदेशी खेळाडू खरेदी करता येतात. तर संपूर्ण टीममध्‍ये 33 पेक्षा जास्‍त खेळाडूंना घेता येत नाही.

लिलावात आठ देशातील 101 खेळाडूंवर नऊ संघ बोली लावत आहेत. या संघानी लिलावापूर्वी काही खेळाडूंशी करार केलेले आहेत.