आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL Beating Issue Most Wanted Daud Ibrahim Is Matermind

आयपीएल बेटिंगचा पैसा असा पोहोचतो दाऊदकडे?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मैदानाबाहेर नेहमी चर्चेत राहिलेला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चे सहावे सत्र स्पॉट फिक्सिंगने कलंकित झाले आहे. या प्रकरणी आणखी दिग्गज चौकशीच्या फेर्‍यात अडकण्याची चिन्हे आहेत.

क्रिकेटमध्ये सट्टा नवीन नाही. ‘आयपीएल’ आता सट्टेबाजांसाठी सर्वात चांगले कुरण झाले होते, ज्याची सगळी सूत्रे दुबईतूनच हलवली जात होती. स्पॉट फिक्सिंगचे प्रकरण 16 मे रोजी एस. र्शीसंत, अजित चंदिला, अंकित चव्हाण या तीन क्रिकेटपटूंच्या अटकेने उजेडात आले. त्यानतंर आता पुन्हा एकदा यात ‘दुबई लिंक’ समोर आली आहे.

डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याचे पंटर या प्रकरणाची सगळी सूत्रे हलवतात हे उघड सत्य आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, गुन्हेगारी विश्वातही ‘डी’ गँगने कॉर्पोरेट स्टाइलने हे सर्व स्पॉट फिक्सिंगचे नेटवर्क पसरवलेले आहे. बेटिंगचे पैसे विशेष कोडवर्ड किंवा इशार्‍यांवर पोहोचवले जात होते.

नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या सहाव्या सीझनमध्ये बेटिंगचे जाळे अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने हाताळले जात असल्याचे स्पष्ट होत आहे. सूचना देणे आणि पैसा याची सुरुवात अनिसपासून होते. त्याच्या सूचनांप्रमाणे अत्यंत विश्वासू सुनील दुबई आणि ज्युनियर कोलकाता काम करतात. सुनील नेहमी टिकू मंडी या दिल्लीतील पंटरच्या संपर्कात असतो. टिकूचे अनेक क्रिकेटपटूंशी अत्यंत जवळचे संबंध निर्माण झाले होते. ज्युनियर कोलकाता टिकूच्या माध्यमातून रमेश व्यास, तसेच आणखी एका बुकीच्या संपर्कात राहायचा. या बुकीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 18 मे रोजी अटक केली आहे.

टिकू मंडी भारतातील एका बुकीशी संपर्कात होता. ज्युपिटर, बाबूराव यादव, जिजू जनार्दन आणि अमित सिंग हेदेखील त्याच्या संपर्कात होते. जनार्दन हा एस. र्शीसंत, अंकित चव्हाण, अजित चंदिला यांच्याशी संपर्कात राहायचा. या खेळाडूंनी अनेक सामने फिक्स केले होते.

सूत्रधार दाऊदच!
मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहिम या सगळ्या प्रकरणाची सगळी सूत्रे हलवत आहे. तो आपला लहान भाऊ अनिस याच्यामार्फतच बेटिंगचे नेटवर्क नियंत्रित करतो. अनिस दुबई आणि कराचीतून या नेटवर्कला चालना देतो व त्यातून मिळालेला पैसा दुबईत पोहोचवला जातो.

विंदू-गुरू लिंक : विंदूदेखील फिक्सिंगच्या साखळीतील एक कडी ठरला. रमेश व्यास ज्युनियर कोलकाता व टिकू मंडीचा मध्यबिंदू आहे. तो चेन्नई सुपरकिंग्जचे सीईओ गुरुनाथ मयप्पनच्या माध्यमातून विंदूच्या संपर्कात आला. पोलिसांच्या तपासात विंद- गुरूचा मोबाइलवरील संवाद उघड झाला.