आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फलंदाजांच्‍या अपयशासाठी 'आयपीएल'ला दोष देणे चुकीचेः गावस्‍कर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍लीः भारतीय फलंदाजांचे इंग्‍लंडपाठोपाठ ऑस्‍ट्रेलियामध्‍येही पानिपत झाले. संघातील वरिष्‍ठ खेळाडुंवर सर्व स्‍तरातून टीका होत आहे. परंतु, या कामगिरीसाठी आयपीएलला दोष देता येणार नाही, असे मत भारताचा माजी कर्णधार लिटील मास्‍टर सुनील गावस्‍कर याने व्‍यक्त केले आहे. अॅडलेड कसोटीआधी भारतीय संघव्यवस्थापनाने कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे गावस्कर म्‍हणाला.
आयपीएलमधील फटकेबाजीमुळे भारतीय फलंदाजांचे तंत्र बिघडले अशी टीका सर्वत्र होत आहे. परंतु, आयपीएलला का दोष द्यावा, असा सवाल लिटील मास्‍टरने विचारला आहे. गावस्‍कर म्‍हणाला, सचिन, लक्ष्मण, राहुल यांचे नव्हे तर सेहवाग, गंभीर यांच्या दोन परदेशी दौऱ्यांवर (इंग्लंड, ऑस्ट्रेलिया) धावा होत नाहीयेत. यासाठी आयपीएलला दोष देणे बरोबर ठरणार नाही. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर सर्वच भारतीय फलंदाजांची दाणादाण उडाली आहे. या खेळपट्ट्यांवर खेळण्यायोग्य तंत्राचा त्यांच्याकडे अभाव आहे. आयपीएलला दोष देता तर वॉर्नरचे काय ? इतर देशांचे खेळाडूही धावा करताहेत. कॅलिस धावांची बरसात करतोय. बीसीसीआयच्या नियमानुसार भारतीय खेळाडू १४ पेक्षा अधिक सामने खेळू शकत नाही याकडेही त्याने लक्ष वेधले.
वरिष्‍ठांबद्दलचा निर्णय अतिशय काळजीपूर्वक घ्‍यायला हवाः धोनी
टीम इंडियाचे \'वाका वाका\', अशी झाली वाताहत ( छायाचित्रे )