आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL Chennai Super Kings Won Against Royal Challengers Bengalurur

कोहलीच्या मैदानावर धोनीचा दबदबा, चेन्नईचे किंग्ज सुपर, बंगळुरूची बोबडी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - विराट कोहलीच्या संघाचे घरचे मैदान, दादागिरी मात्र धोनीच्या संघाची. बंगळुरूत बुधवारी चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला चीत केले. आधी शानदार फलंदाजीच्या बळावर तगडे आव्हान रचून फलंदाजांवर दबाव वाढवला. त्यानंतर धारदार गोलंदाजी, तितकेच उत्तम क्षेत्ररक्षण चेन्नईच्या पारड्यात विजयाचे दान देऊन गेेले. आयपीएलमध्ये धोनीसेनेच्या १८२ धावांचे भलेमोठे आव्हान गाठताना बंगळुरूच्या तोंडाला फेस आला. २० षटकांत ८ बाद १५४ इतकीच त्यांची मजल. चेन्नईने २७ धावांनी विजय साजरा केला.

नाणेफेक जिंकून कोहलीने क्षेत्ररक्षण घेऊन पायावर धोंडाच पाडून घेतला. स्मिथ (३९), सुरेश रैना (६२) व डुप्लेसिसने (३३) वादळी फलंदाजी करून बंगळुरूच्या गोलंदाजांना जेरीस आणले. आयपीएलच्या या पर्वात शांत असलेल्या रैनाच्या बॅटने बुधवारी मात्र आगच ओकली. अवघ्या ३२ चेंडूंत ६ षटकार व ४ चौकारांचा पाऊस पडला. ९ पेक्षांही जास्त धावगती बंगळुरूला पेलवली नाही. गेल नसल्यामुळे त्यांची फलंदाजी लंगडी झालीच होती. त्यात डिव्हिलर्सचे १४ वर धावबाद होणे त्यांच्यासाठी पराभवाचे द्वार खुले करून गेले. एकटा कोहली (५१) एका बाजूने लढला खरा; पण त्याच्या खेळात ‘जान’ नव्हती. धावगती वाढत असताना ठरावीक अंतराने त्यांचे गडी माघारी येत राहिले. आशिष नेहराने बंगळुरूला जखडून ठेवलेे. त्याने १० धावांच्या बदल्यात ४ बळी घेतले.

नेहरा नेटाने, रैनाही बरसे!
सुरेश रैना आणि आशिष नेहरा चेन्नईच्या विजयाचे प्रमुख शिल्पकार ठरले. मॅक्लुम (४) लवकर बाद होताच रैना खेळपट्टीवर अवतरला आणि षटकारांची जणू आतषबाजीच सुरू झाली. १९३ हूनही जास्त स्ट्राइक रेटने त्याने बंगळुरूची गोलंदाजी फोडली. दुसरीकडे आशिष नेहराने नेटाने गोलंदाजी केली. ४ षटके, १० धावा आणि बिनीचे ४ बळी हे त्याचे पृथक्करण थक्क करणारे होते. एकाच षटकात दोघांना बाद करून त्याने बंगळुरूला खाईत लोटले.
पुढील स्लाइडवर पाहा, सामन्याचा स्कोअर बोर्ड...