आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL: Chennai Vs Mumbai T20 Match Live, Divya Marathi

IPL-7: सुरेश रैनाच्‍या अर्धशतकाने चेन्‍नईचा \'सुपर\' विजयासह, अंतीम फेरीत प्रवेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयपीएल-७ मधील ‘क्वालिफायर’ फेरीतील दुसर्‍या सामन्यात मुंबई इंडियन्स दोन वेळा विजेत्या ठरलेल्या चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध आज लढत आहे. मुंबईने दिलेल्‍या 173 धावांच्‍या आव्‍हानाचा पाठलाग करताना चेन्‍नईने आश्‍वासक सुरुवात केली आहे.
चेन्‍नईने 18.4 षटकांतच लक्ष गाठत मुंबईवर सुपर विजय प्राप्‍त केला. सुरेश रैना (54) आणि डेविड हसी (40) धावांवर नाबाद राहिले.
तत्‍पूर्वी प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकामध्‍ये 8 बाद 173 धावा केल्‍या. हरभजन सिंग (7) आणि प्रज्ञान ओझा (1) धावांवर नाबाद राहिले आहेत.
फिरकीची कमाल
चेन्‍नईचे फिरकीचे मुख्‍य अस्‍त्र असलेल्‍या रवींद्र जडेजाने मुंबईच्‍या फलंदाजीला सुरंग लावला. त्‍याने हसीला त्रिफळाचित केले.
त्‍यानंतर आलेल्‍या कोरी एंडरसनने तुफानी सुरवात करताना दोन षटकार आणि एक चौकाराच्‍या सहाय्याने 20 धावा काढल्‍या. एंडरसन खेळपट्टीवर स्थिरावणार तोच अश्विनने पांडे करवी त्‍यास बाद केले.
.
उभय संघ
चेन्नई - ड्वेन स्मिथ, ब्रेंडन मॅक्कुलम, फाफ डु प्लेसिस, सुरेश रैना, डेविड हसी, कर्णधार महेंद्र सिंह धोनी, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहित शर्मा, ईश्वर पांडे आणि आशीष नेहरा

मुंबई - लेंडल सिमन्‍स, माइक हसी, कर्णधार रोहित शर्मा, कीरॉन पोलार्ड, अंबाती रायडू, कोरी एंडरसन, आदित्य तारे, हरभजन सिंह, प्रवीण कुमार, प्रज्ञान ओझा आणि जसप्रीत बुमराह
सामन्‍यादरम्‍यानची छायाचित्रे पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा..