आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL Chennai Won Against Punjab And Mumbai Defeated Hyderabad

मुंबई इंडियन्स विजयी, वानखेडेवर पहिला विजय; सनरायझर्सवर २० धावांनी मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राेहित शर्माच्या मुंबई इंडियन्स संघाने शनिवारी अाठव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात धडाकेबाज विजयाची नाेंद केली. यजमान मुंबई संघाने अापल्या घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादवर २० धावांनी मात केली. यासह मुंबई संघाने स्पर्धेत दुसऱ्या विजयाची नाेंद केली.

मलिंगा (४/२३) अाणि मॅक्लिनघन (३/२०) यांच्या धारदार गाेलंदाजीच्या बळावर मुंबई संघाने वानखेडेवर सामना जिंकला. सलामीवीर सिमन्सच्या (५१) अर्धशतकामुळे प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने ८ बाद १५७ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादला अाठ गड्यांच्या माेबदल्यात १३७ धावांपर्यंत मजल मारता अाली. यासह हैदराबादला स्पर्धेत चाैथ्या पराभवाला सामाेरेे जावे लागले.

यजमान मुंबई इंडियन्सला २० षटकांत ८ बाद १५७ धावसंख्येवर रोखणाऱ्या हैदराबादच्या सनरायझर्सला ५ षटकातील बिनबाद ४५ अशा झंझावाती सुरुवातीनंतरही छोटे आव्हान पेलवले नाही. यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील मुंबई इंडियन्सला दुसरा विजय मिळवून देण्यात सनरायझर्सच्या फलंदाजांचाही मोठा हात होता. १४.५ षटकांत ४ बाद १०४ अशा सुस्थितीतून त्यांचा डाव ८ बाद १३७ असा गडगडला. यजमान मुंबईने २० धावांनी सामना जिंकला व यंदाच्या हंगामातील दुसऱ्या विजयाची नोंद केली. पैलतीरी लावली. हैदराबादच्या शिखर धवनने २९ चेंडूंचा सामना करताना ७ चौकारांसह ४२ धावा फटकावल्या. के. एल. राहुलने २७ चेंडूंत २५ तर रवी बोपाराने धावचीत होण्याआधी २७ चेंडूंत २३ धावा काढल्या.

सिमन्सचा दणका
मुंबईचा कर्णधार रोहित व सिमन्सने तिसऱ्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. सिमन्सने ५१ धावा काढल्या. त्याने दुसरे अर्धशतक ठाेकले. रोहित २४ धावांवर परतला. पोलार्डने शानदार ३६ धावा काढल्या.

मुंबईचा दुसरा विजय
मुंबई इंडियन्स संघाने सलगच्या पराभवाची मालिका खंडित करताना अायपीएलच्या यंदाच्या सत्रात शनिवारी दुसऱ्या विजयाची नाेंद केली. यजमान संघाने वानखेडेवर पहिला विजय मिळवला. सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा सामना मुंबईने २० धावांनी जिंकला. मुंबईचा सात सामन्यांत हा दुसरा विजय ठरला. मुंबईला गुणतालिकेत तळातील स्थान उंचावता अाले नाही.
पुढील स्लाइड्सवर वाचा, चेन्नईने पंजाबला केले पराभूत... टेबल...