आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL : Delhi Daredavils And Kolkata Knight Riders Won On Saturday

सनरायझर्सचा "अस्त', डेअरडेव्हिल्स "मस्त', नाइट रायडर्सकडून किंग्जचा पराभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विशाखापट्टणम - कर्णधार जे.पी. डुमिनीच्या (५४ धावा आणि १७ धावांत ४ विकेट) अष्टपैलू कामगिरीच्या बळावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने शनिवारी सनरायझर्स हैदराबादला ४ विकेटने पराभूत केले. आयपीएल-८ मध्ये दिल्लीचा हा दुसरा विजय ठरला.

दिल्लीने २० षटकांत ४ बाद १६७ धावा काढल्यानंतर हैदराबादला ८ बाद १६३ धावांवर रोखले. स्पर्धेच्या सुरुवातीला दिल्लीने पहिले दोन सामने गमावले. मात्र, तिसऱ्या आणि चौथ्या लढतीत त्यांनी शानदार खेळ करून विजय खेचून आणला. चौथ्या सामन्यात अखेरच्या षटकात विजयश्री मिळवली. सामन्याचा रोमांच अखेरच्या चेंडूपर्यंत कायम होता. हैदराबादला अखेरच्या चेंडूवर विजयासाठी ५ धावांची गरज होती. मात्र, नॅथन कुल्टर नीलने कसून गोलंदाजी करताना त्यांचे मनसुबे मोडून काढले. हैदराबादकडून रवी बोपाराशिवाय (४१ धावा) इतर कोणालाही प्रभावी कामगिरी करता आली नाही. डेव्हिड वॉर्नरने २७ तर लोकेश राहुलने २४ धावांचे योगदान दिले. सलामीवीर शिखर धवन १८ आणि नमन ओझा १२ धावा काढून बाद झाले. इयान मोर्गन तर केवळ १ धाव काढून परतला. रेड्डीने १५ तर कर्ण शर्माने १९ धावांचे योगदान दिले.

तत्पूर्वी, श्रेयस अय्यर (६०) आणि जे.पी. डुमिनी (५४) यांच्या बळावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने ४ बाद १६७ धावांचा आव्हानात्मक स्कोअर उभा केला. दिल्लीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. श्रेयस आणि डुमिनीने दुसऱ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली.

केदार चमकला
अखेरच्या वेळी श्रीलंकन खेळाडू अँग्लो मॅथ्यूजने नाबाद १५ आणि केदार जाधवने नाबाद १९ धावा काढून दिल्लीला १५० च्या पुढे पोहोचवले. मॅथ्यूजने अखेरच्या ११ चेंडूंत १ षटकार, तर जाधवने १ चौकार, १ षटकार खेचून ४ बाद १६७ चा स्कोअर गाठून दिला.

टर्निंग पॉइंट
अखेरच्या षटकात दिल्लीकडून कुल्टर नील गोलंदाजी करीत होता. अखेरच्या २ चेंडूंवर हैदराबादला विजयासाठी ५ धावांची गरज होती. स्ट्राइकवर असलेल्या कर्ण शर्माने पाचव्या चेंडूवर जोरदार उंच फटका मारला. पॉइंटच्या सीमारेषेवर मयंक अग्रवालने सीमारेषेच्या अगदी जवळ हवेत उडी मारून चेंडूला मैदानात ढकलत षटकार रोखला. त्याने सामना वाचवला.
पुढील स्लाइड्सवर कोलकात्याच्या सामन्याचे वृत्त आणि धावफलक