आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL : Delhi Daredavils Won The Match Against Mumbai Indians

IPL : दिल्लीत मुंबईचे पानिपत, मुंबई इंडियन्सचा 157 धावांत खुर्दा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अाठव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी मुंबई इंडियन्स संघाचे दिल्लीच्या मैदानावर पानिपत झाले. यजमान दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने सामन्यात राेहित शर्माच्या मुंबई इंडियन्सवर ३७ धावांनी शानदार विजय संपादन केला. यासह दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने यंदाच्या सत्रात तिसऱ्या विजयाची नाेंद केली. दिल्लीने गुणतालिकेत चाैथ्या स्थानावर धडक मारली.
इम्रान ताहिर (३/२२), अमित मिश्रा (२/३२) अाणि मॅथ्यूज (२/१५) यांच्या धारदार गाेलंदाजीच्या बळावर यजमान दिल्ली संघाने सामना जिंकला. यासह मंुंबईच्या संघाला स्पर्धेत पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला.

श्रेयस अय्यर (८३) अाणि जेपी डुमिनी (नाबाद ७८) यांच्या धडाकेबाज फलदंाजीच्या बळावर दिल्ली संघाने प्रथम फलंदाजी करताना मुंबईसमाेर विजयासाठी १९१ धावांचे अाव्हान ठेवले हाेते. या खडतर अाव्हानाला प्रत्युत्तर देणाऱ्या मुंबई इंडियन संघाला ९ गड्यांच्या माेबदल्यात १५३ धावांपर्यंत मजल मारता अाली. मुंबईकडून राेहित शर्मा अाणि अंबाती रायडू या दाेघांनी प्रत्येकी ३० धावांची खेळी केली. मुंबईचे इतर सर्व दिग्गज फलंदाज स्वस्तात बाद झाले.

धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबई संघाची चांगलीच दमछाक झाली. दिल्लीच्या धारदार गाेलंदाजीमुळे मुंबईच्या अव्वल फलंदाजांना फार काळ मैदानावर अाव्हान कायम ठेवता अाले नाही. सलामीवीर सिमन्स (१५) अाणि पार्थिव पटेल (२८) यांनी संघाला ३५ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. उन्मुक्त चंदने १४ धावांची खेळी केली.

इम्रानची धारदार गाेलंदाजी

दिल्लीकडून इम्रान ताहिरने धारदार गाेलंदाजी केली. त्याने चार षटकांत २२ धावा देत तीन विकेट घेतल्या. त्याने अंबाती रायडू, हार्दिक पांड्या अाणि मॅक्लिघन या तिघांना तंबूत पाठवले. तसेच अमित मिश्रा अाणि मॅथ्यूजने प्रत्येकी दाेन गडी बाद केले. मुथुस्वामी व कुल्टर नाइलने प्रत्येकी एक विकेट घेतली.

डुमिनी-अय्यरची दीडशतकी भागीदारी
सलामीवीर श्रेयस अय्यर व डुमिनीने मुंबईच्या गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. दाेघांनी दुसऱ्या गड्यासाठी १५४ धावांची भागीदारी केली. युवा फलंदाज श्रेयसने ५६ चेंडूंत ८३ धावांची खेळी केली. त्याचे हे दुसरे अर्धशतक ठरले. डुमिनीने ५० चेंडूंत नाबाद ७८ धावा काढल्या.
पुढील स्लाइडवर वाचा स्कोअर कार्ड आणि पॉइंट्स टेबल