आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीसमाेर अाज मुंबईचे अाव्हान! थेट प्रक्षेपण रात्री ८ वाजेपासून साेनी मॅक्सवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सलगच्या विजयाने अात्मविश्वास बुलंदीवर असलेला मुंबई इंडियन्स संघ अाठव्या सत्राच्या इंडियन प्रीमियम लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या प्ले अाॅफमधील अापला प्रवेश निश्चित करण्यासाठी सज्ज अाहे. मंगळवारी जेपी डुमिनीच्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाला मंगळवारी यजमान मुंबई इंडियन्सच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागेल. गत सामन्यात राजस्थानविरुद्ध सामन्यात दिल्लीला पराभवाला सामाेरे जावे लागले. अाता विजयी ट्रॅकवर येण्याचा दिल्ली संघाचा प्रयत्न असेल.

दुसरीकडे सिमन्स, पार्थिव पटेल अाणि राेहित शर्मा सध्या जबरदस्त फाॅर्मात अाहेत. त्यामुळे पुन्हा एकदा घरच्या मैदानावर विजयी पताका फडकावण्यासाठी यजमान मुंबई इंडियन्स उत्सुक अाहे. गत सामन्यात मुंबई संघाने माेहालीच्या मैदानावर वीरेंद्र सेहवागच्या किंग्ज इलेव्हन पंजाबवर मात केली. अाता ही विजयी लय अागामी सामन्यातही कायम ठेवण्यासाठी मुंबईचा प्रयत्न असेल. फलंदाजीत सिमन्स, पार्थिव पटेलसह पाेलार्ड,अंबाती रायडू माेठ्या खेळीसाठी उत्सुक अाहेत. तसेच गाेलंदाजीची मदार मलिंगा, मॅक्लिनघन अाणि विनयकुमारवर असेल. दुसरीकडे सलगच्या पराभवाने दिल्ली संघ अडचणीत सापडला अाहे. अातापर्यंत झालेल्या अाठपैकी चार सामन्यांत दिल्लीला पराभवाला सामाेरे
जावे लागले.