आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL : द्रविड आहे प्रेरणास्थानी - शेन वॉटसन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉटसनने कर्णधार राहुल द्रविडचा प्रभाव आणि प्रदर्शनाला पूर्ण सन्मान देताना तो संघासाठी प्रेरणास्थान असल्याचे म्हटले आहे. वॉटसन म्हणाला, ‘वयाच्या विशीत तो जसा खेळत होता, तसाच राहुल द्रविड आज वयाच्या चाळिशीत खेळतोय. तो संघासाठी आणि माझ्यासाठीसुद्धा प्रेरणास्थान बनला आहे. मी आतापर्यंत जितक्या शानदार लोकांशी भेटलो आहे, त्यापैकी राहुल एक आहे. तो कर्णधार म्हणूनही शानदार प्रदर्शन करीत आहे. अखेर आम्हा सर्वांचे एक लक्ष आहे, ते म्हणजे गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावण्याचे. सध्या तरी आम्ही आठ विजयांसह तिस-या स्थानापर्यंत धडक दिली आहे. यापुढेही अशीच कामगिरी करू,’ असा विश्वास त्याने व्यक्त केला.