आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक पुढच्या आठवड्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या इंडियन प्रीमियर लीग टी-20 स्पर्धेच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक पुढच्या आठवड्यात होईल. ही बैठक 22 एप्रिल रोजी चेन्नईत होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीचा मुख्य अजेंडा काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, आयपीएलमधील प्ले ऑफच्या दोन सामन्यांच्या यजमानपदाबाबत या बैठकीत चर्चा होऊ शकते. चेन्नईत होणा-या सामन्यांत श्रीलंकन खेळाडूंच्या सहभागाबाबतही या वेळी चर्चा शक्य असल्याचे बोलले जाते.

* राजस्थान रॉयल्सने (3/179) आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध आपली दुसरी सर्वोच्च् धावसंख्या उभी केली. यापूर्वी त्यांनी 13 मार्च 2010 रोजी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबईविरुद्धच 208 धावा काढल्या होत्या.

* अजिंक्य रहाणेने (नाबाद 68) आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना पाचवे शतक झळकावले.

* अजिंक्स रहाणेने आयपीएलमध्ये 1000 धावांचा टप्पा पूर्ण केला. त्याने आयपीएलमध्ये तिस-यांदा सामनावीराचा पुरस्कार ठरला.