आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL Helps Players Relax And Enjoy Themselves, Says Virat Kohli

आयपीएलने तणावमुक्तीचा आनंद मिळतो : कोहली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - क्रिकेटपटूंच्या आधीच्याच व्यस्त वेळापत्रकात आयपीएलमुळे अतिरिक्त भार पडत असल्याची वक्तव्ये टीकाकारांकडून होत असली तरी रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार असलेल्या विराट कोहलीने मात्र आयपीएलमुळे खेळाडूंना तणावमुक्तीचा आनंद उपभोगता येत असल्याचे म्हटले आहे.

आयपीएलमध्ये आम्ही जितके अधिक आनंदात क्रिकेट खेळू शकतो, तितका खेळ चांगला होतो, असेही कोहलीने नमूद केले आहे. आंतरराष्ट्रीय वेळापत्रकातून आलेला प्रत्येक खेळाडू या स्पर्धेत तणावमुक्त होऊन निवांतपणे खेळत असल्याचे रॉयल चॅलेंजर्सच्या टी शर्ट अनावरणप्रसंगी कोहलीने सांगितले.

हुआवेईबरोबर करार
रॉयल चॅलेंजर्सचे प्रायोजकत्व यंदा चीनची मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या हुआवेईबरोबर करण्यात आला आहे. या कंपनीचा लोगो टी शर्टवर राहणार असून कंपनी रॉयल चॅलेंजर्सशी जोडली गेल्याचा आनंद असल्याचेही त्याने नमूद केले. तसेच त्यांचा लोगो आमच्या नशिबाला पालटवणारा ठरो, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली.

विजेतेपद पटकावणारच
टी -20 विश्वचषकातील स्पर्धेचा मानकरी ठरलेल्या विराटने यंदाच्या मोसमात रॉयल चॅलेंजर्सला पहिले विजेतेपद मिळवून देण्याचा आम्ही संकल्प केला असल्याचे सांगितले. काही अजून चांगले खेळाडू आम्ही घेतले असून त्यामुळे हा संकल्प नक्कीच पूर्ण होईल, असा विश्वासही कोहलीने व्यक्त केला.