नितीश राणा पुन्हा / नितीश राणा पुन्हा चमकला; मुंबई गुणतालिकेत टॉपवर!

मॅचमध्ये रोहीत शर्मा जोरदार शॉट लगावतांना. मॅचमध्ये रोहीत शर्मा जोरदार शॉट लगावतांना.

वृत्तसंस्था

Apr 17,2017 07:19:00 AM IST
मुंबई - आयपीएल-१० मध्ये वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात लायन्सला ६ विकेटने पराभूत केले. सलग चौथ्या विजयासह मुंबईने गुणतालिकेत ८ गुणांसह अव्वलस्थान पटकावले. मुंबईकडून युवा खेळाडू नितीश राणा पुन्हा चमकला. मॅन ऑफ द मॅच नितीशने अर्धशतकी खेळी केली. दुसरीकडे गुजरात लायन्सचा हा चार सामन्यांतील तिसरा पराभव ठरला. गुजरातने ४ बाद १७६ धावा काढल्या होत्या. मुंबईने १९.३ षटकांत १७७ धावा दणदणीत काढून विजय मिळवला.
मुंबईने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातकडून अॅरोन फिंचच्या जागी जेसन रॉयला संधी मिळाली, तर मुनाफ पटेलने तब्बल ४ वर्षांनी आयपीएलच्या मैदानावर पुनरागमन केले. गुजरातचा सलामीवीर ड्वेन स्मिथ शून्यावर बाद झाला. यानंतर ब्रेंडन मॅक्लुम (६४) आणि सुरेश रैना (२८) यांनी ८० धावांची भागीदारी केली. मॅक्लुमने ४४ चेंडूंत ३ षटकार, ६ चौकारांसह तुफानी खेळी केली. दिनेश कार्तिकने २६ चंेंडूंत नाबाद ४८ धावा काढून गुजरातला १७६ धावांपर्यंत पोहोचवले.
प्रत्युत्तरात मुंबईची सुरुवातही चांगली झाली नाही. पार्थिव पटेल शून्यावर बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर नितिश राणा खेळण्यास आला. त्याने ५३ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याच्याशिवाय मुंबईकडून जोस बटलरने २६ आणि कर्णधार रोहित शर्माने नाबाद ४० धावा काढून विजयात योगदान दिले. रोहितने २९चेंडूंत १ षटकार, ३ चौकारांसह ही खेळी केली. मुंबईला अखेरच्या षटकात विजयासाठी ८ धावांची गरज होती. त्याने हार्दिक पंड्यासोबत या धावा काढून विजय निश्चित केला.

धावलफलक
गुजरात लायन्स धावा चेंडू ४ ६
स्मिथ झे. राणा गो. मॅक्लानघन ०० ०२ ०० ०
ब्रेंडन मॅक्लुम त्रि. गो. मलिंगा ६४ ४४ ०६ ३
रैना झे. रोहित गो. हरभजन २८ २९ ०२ ०
इशान झे. कृणाल गो. मॅक्लानघन ११ १४ ०१ ०
दिनेश कार्तिक नाबाद ४८ २६ ०२ २
जेसन राॅय नाबाद १४ ०७ ०१ १
अवांतर : ११. एकूण : २० षटकांत ४ बाद १७६ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-१, २-८१, ३-९९, ४-१५३. गोलंदाजी : मॅक्लानघन ४-०-२४-२, लेसिथ मलिंगा ४-०-५१-१, हरभजनसिंग ४-०-२२-१, बुमराह ४-०-४५-०, कृणाल ३-०-१८-०, हार्दिक १-०-१५-०.
मुंबई इंडियन्स धावा चेंडू ४ ६
पार्थिव झे. रॉय गो. प्रविण ०० ०२ ०० ०
बटलर झे. मॅक्लुम गो. पटेल २६ २४ ०१ २
नितिश झे. कार्तिक गो. टाय ५३ ३६ ०४ २
रोहित शर्मा नाबाद ४० २९ ०३ १
पोलार्ड झे. जडेजा गो. टाय ३९ २३ ०२ ३
हार्दिक पंड्या नाबाद ०६ ०३ ०१ ०
अवांतर : १३, एकूण : १९.३ षटकांत ४ बाद १७७ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-०, २-८५, ३-९२, ४-१६०. गोलंदाजी : प्रवीणकुमार २.३-०-२५-१, थम्पी ४-०-३४-०, मुनाफ पटेल ४-०-३५-१, टाय ४-०-३४-२, रवींद्र जडेजा ४-०-३४-०, डी. स्मिथ १-०-१२-०.
X
मॅचमध्ये रोहीत शर्मा जोरदार शॉट लगावतांना.मॅचमध्ये रोहीत शर्मा जोरदार शॉट लगावतांना.
COMMENT