आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL Live Match Mumbai Indians Vs Delhi Daredevils

DD v MI : मुंबईची दुसर्‍या विजयाची प्रतीक्षा कायम, दिल्लीने केले ३७ धावांनी पराभूत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मुंबई इंडियन्सला दिल्ली डेअरडेव्हिल्सने विजयासाठी ठेवलेले 191 धावांचे आव्हान आव्हान पूर्ण करता आलेले नाही. या सामन्यात मुंबईचा ३७ धावांनी पराभव झाला. दिल्लीने चार विकेट गमावत 190 धावा केल्या होत्या. त्यात अय्यरने सर्वाधिक 83 तर ड्युमिनीने 78 धावा केल्या.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सामन्याच्या तिसर्‍याच चेंडूवर मॅकलॅघनने अग्रवालला बाद करत दिल्लीला मोठा धक्का दिला. पण त्यानंतर मात्र श्रेयस अय्यर आणि कर्णधार जेपी ड्युमिनी मैदानात नांगर टाकल्याप्रमाणे खेळत राहिले. त्यांनी दुसर्‍या विकेटसाठी 154 धावांची भागिदारी केली. पहिल्या षटकातील विकेटनंतर थेट 17 व्या षटकात मलिंगाने श्रेयस अय्यरला बाद केले. त्यानंतर मॅथ्यूजही पुढच्याच षटकात बाद झाला. तर युवराजही अवघ्या दोन धावा काढून बाद झाला.
संघ अशी आहेत,
दिल्ली डेअर‍डेव्हिल्स : मयंक अग्रवाल,श्रेयस अय्यर, जेपी डुम‍िनी, युवराज सिंग, अँजेलो मॅथ्‍यूज, केदार जाधव,नाथन कोल्टर नील, अमित मिश्रा, शहबाज नदीम, इम्रान ताहिर आणि डोमनिक मुथ्‍थूस्वामी.

मुंबई इंडियन्स
लेंडल सिमन्स, पार्थिव पटेल, उन्मुक्त चंद, रोहित शर्मा, किरॉन पोलार्ड, अंबाती रायडू, हरभजन सिंग, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, मिचेल मॅक्लेंघन आणि लसिथ मलिंगा.