आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL Match Fixing News In Marathi, Mayyapian, Vindu Darasingh

आयपीएल मॅच फिक्सिंग: मय्यपन, विंदू दारासिंग पुन्हा अडचणीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आयपीएल मॅच फिक्सिंग प्रकरणातील दोषी चेन्नई सुपर किंग्जचा गुरुनाथ मयप्पन आणि बुकी विंदू दारासिंग पुन्हा अडचणीत सापडले आहेत. या दोघांच्याही टेपमधील आवाजात साम्य असल्याचे नुकतेच फॉरेन्सिक चाचणीत स्पष्ट झाले आहे. हा अहवाल नुकताच मुंबईच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आला. या अहवालाच्या पुराव्यामुळे मय्यपनने टीममधील गुप्त माहिती लीक केल्याचेही समोर येणार आहे. या अहवालाने दोघांविरुद्धचे प्रकरणही आता अधिक मजबूत झाले आहे.


तपास अधिका-यांकडे मय्यपन आणि विंदू यांच्यात दूरध्वनीवर झालेल्या संभाषणांची ट्रॉन्सस्क्रिप्ट आहे. गत सप्टेंबरमध्ये या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यात या दोघांशिवाय 22 जणांविरुद्धदेखील आरोपपत्र सादर करण्यात आले. यात पाकचे पंच असद रऊफचाही समावेश आहे. ट्रॉन्सस्क्रिप्टमधील आवाज हा मय्यपन आणि विंदूचा नसल्याचा दावा बचाव पक्षाच्या वकिलाने न्यायालयात याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान केला. मात्र, गुरुनाथ मय्यपन हा पवन जयपूर, संजय जयपूर आणि चंद्रेश जैन ऊर्फ ज्युपीटरसारख्या बुकीच्या संपर्कात होता.
एका चर्चेदरम्यान बुकी विंदू हा मय्यपनला म्हणाला होता, ‘तुम्हीच संघाचे (चेन्नई सुपर किंग्ज) बॉस आहात. तुम्ही त्या ठिकाणी (स्टेडियम) जाऊन चाहते काय विचार करत आहेत याची माहिती काढा.’ यादरम्यान दोघांनी नाणेफेक, प्लेइंग इलेव्हन, खेळपट्टी आणि हवामानाबाबत चर्चा केली.