आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL: Mudgal Report Puts Spotlight On MS Dhoni's Ties With Rhiti Sports

IPL: फिक्सिंगच्या अहवालात धोनीकडे अंगुलिनिर्देश; ज्येष्ठ खेळाडूचा हात असल्याचा उल्लेख

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आयपीएल फिक्सिंग व सट्टेबाजीच्या झळा टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी व सुरेश रैनाच्या उंबरठय़ापर्यंत आल्या आहेत. न्या. मुद्गल चौकशी समितीने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या अहवालात या दोघांचा थेट उल्लेख नसला तरी टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू.. विश्वचषक स्पध्रेत खेळलेला खेळाडू.. असे उल्लेख आहेत. विशेष म्हणजे आयपीएस जी. संपत यांनी न्या. मुद्गल यांच्याकडे सोपवलेल्या अहवालात सट्टेबाज किट्टी याचा हवाला देताना धोनी व रैना यांचे सट्टेबाजीच्या मास्टरमाइंडशी संबंध होते, असा थेट उल्लेख केला आहे.

न्या. मुद्गल यांनी अहवालात म्हटले आहे की, टीम इंडियाचे जे सहा खेळाडू सट्टेबाजीत होते त्यातील एक अजूनही संघात आहे. ही नावे लिफाफाबंद असून 7 मार्चला सुप्रीम कोर्टात याचा पर्दाफाश होऊ शकतो.

न्या. मुद्गल यांच्याकडे सोपवलेल्या अहवालात संपत म्हणतात, ‘पासपोर्ट रॅकेटचा तपास करताना काही सट्टेबाज पकडले होते. यात उत्तम जैन ऊर्फ किट्टी होता. धोनी, सुरेश रैना, मयप्पन व राजस्थानच्या काही खेळाडूंशी आपला संपर्क असल्याचे त्याने चौकशीत सांगितले होते.’ त्यांचा मास्टरमाइंड विक्रम अग्रवाल असल्याचे संपत म्हणतात. किट्टीनुसार, मयप्पन व त्याची पत्नी रूपा यांची विक्रम व त्याची पत्नी वंदना यांच्याशी जवळीक होती. मयप्पनमुळे नंतर धोनी आणि रैनाही विक्रम अग्रवालचे मित्र बनले होते.

या कारणांमुळे धोनीवर संशय
सत्य का दडवले?
मुद्गल समितीने मयप्पनबद्दल माहिती मिळवण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्जच्या अधिकार्‍यांसोबत चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यालाही बोलावले. मयप्पनचा संघाशी संबंध नसल्याचे धोनीने सांगितले होते. या संघाचे ते केवळ सर्मथक असल्याचे त्याने सांगितले. हेच बीसीसीआयचे अध्यक्षही सांगत होते.

वास्तविक 2008 ते 2010 या काळात मयप्पनला आयपीएलमध्ये जी अधिस्वीकृती देण्यात आली होती त्यात त्याच्या पदाचा उल्लेख ‘मालक’ असा करण्यात आला होता. 2011 ते 2013 या काळात मयप्पन मालकाऐवजी ‘टीम प्रिन्सिपल’चे कार्ड अडकवून संघासोबत राहिल्याचा इतिहास.

सामन्यात 140 धावा होतील
चौकशी समितीकडे असलेल्या फोन ट्रान्सक्रिप्ट आणि चेन्नईत पकडलेला सट्टेबाज किट्टीनुसार मयप्पनने विंदूला फोनवर कळवले होते की, 12 मे 2013 रोजी आमचा संघ जयपूरमध्ये 130 ते 140 धावा करेल.